भोजापूर धरण 100% भरले; बंधाऱ्याने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी

Bhojapur Dam Latest Marathi news
Bhojapur Dam Latest Marathi newsesakal
Updated on

नांदूर शिंगोटे (जि. नाशिक) : नगर नाशिक हद्दीवर म्हाळुंगी नदीवर असणारे भोजापूर धरण (Bhojapur Dam) 100% भरले असून, सदरच्या पूर पाण्याने पूर्व भागातील नद्या व बंधाऱ्याने पाणी सोडण्यात यावे अशी मागणी छावाचे विलास पांगारकर यांनी केली आहे. (Bhojapur Dam 100 percent full Demand of water be released by chhava group nashik latest marathi news)

म्हाळुंगी नदीवर वसलेले भोजापुर धरण व पश्चिम पट्ट्यात ठाणगाव भागामध्ये चांगल्या प्रकारे पावसाने जोर धरल्यानंतर म्हाळुंगी नदीवर असणाऱ्या भोजापुर धरणात गेल्या पाच-सहा दिवसापासून चांगल्या प्रकारे पाण्याचा जोर वाढलेला होता.

सदरचे धरण केव्हा भरते याकडे पूर्व भागातील चास नळवाडी कासरवाडी नांदूर शिंगोटे दोडी निमोण पळसखेडे मानोरी कणकोरी मरळ आधी भागातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून होते. कारण पूर्व भागात कमी प्रमाणात पाऊस झाला मात्र नद्या नाल्यांना पाहिजे त्या प्रकारे पाणी न वाहिल्यामुळे बहुतांशी बंधारे हे कोरडे टाकत आहे.

Bhojapur Dam Latest Marathi news
खड्डेयुक्त रस्त्यांचे ‘माजी नगरसेवक पंक्चर सेंटर’ नामकरण

मात्र भोजापुर धरण पूर्ण 100% भरल्यानंतर पाठचारीद्वारे व नद्यांद्वारे या धरणातून पूर पाणी सोडल्यानंतर ते शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत असते मागील वर्षी भोजापुर धरण हे पूर्ण क्षमतेने भरलेले नसल्यामुळे पूर पाणी हे कुणालाही मिळाले नाही.

मात्र यावर्षी सदरचे धरण हे लवकरच ओव्हरफ्लो झाल्यामुळे व काल रात्री सदरच्या धरणाची सांडवे पडल्यानंतर सर्वच शेतकऱ्यांच्या आशा आता पूर पाणी मिळण्याकडे लागल्या असून सदरचे पूर पाणी सोडण्यात यावे व पूर्व भागापर्यंत अशा प्रकारे पोहोचेल असे नियोजन करावे अशी मागणी पूर्व भागातील शेतकरी वर्गासह छावाचे पांगारकर यांनी केली आहे.

कारण सदरच्या पूरक पाण्यामुळे जी कोडीठात भरणे आहे ती भरली जातील व शेतकऱ्यांना याचा निश्चितच फायदा होईल. त्यामुळे सदरचे पूर्व पाणी त्वरित सोडण्यात यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या दोन दिवसांपूर्वी भोजापुर धरणातील पाणी पातळीत चांगल्या प्रकारे वाढ झाल्यानंतर जि प सदस्य सिमिंतीनी कोकाटे यांनी सदरच्या भोजापुर धरणावर पोहोचून पाणी पूजन केले, यावेळी त्यांच्या समवेत संजय, संदीप शेळके, भारत शेळके, संदीप मोक्ष, राजेंद्र दराडे, शरद देशमुख आदींसह कार्यकर्ते भोजापूर धरणावर उपस्थित होते.

Bhojapur Dam Latest Marathi news
खुटवडनगर, डीजीपीनगर रात्रभर अंधारात; वीज कंपनीचा भोंगळ कारभार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.