Nashik News : रेशन दुकानदारांना जानेवारीत नवीन पॉस मशिन मिळणार : भुजबळ

Officials of Sinnar Taluka Ration Shopkeepers Association participated in the march here.
Officials of Sinnar Taluka Ration Shopkeepers Association participated in the march here. esakal
Updated on

Nashik News : राज्यातील रेशन दुकानदारांना प्रत्येक महिन्याचे कमिशन त्याच महिन्यात देण्यात येईल.

बायोमेट्रिक धान्य वितरण प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नव्या वर्षात जानेवारी महिन्यात नवीन पॉस मशिन पुरवण्यात येतील अशी ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.(Bhujbal statement of Ration shopkeeper to get new pos machines in January nashik news)

नागपूर येथे सोमवारी प्रलंबित मागण्यांसंदर्भात राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी विधानभवनावर मोर्चा काढला होता. यानंतर दुकानदारांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना मंत्री भुजबळ म्हणाले,‘ रेशन दुकानदारांच्या अनेक वर्षापासूनच्या मागण्या प्रलंबित होत्या. त्याकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र दुकानदार महासंघाने मोर्चा काढला होता.

दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यासाठी ३१ मार्चची मुदत देण्यात आली. धान्य वाटपाचे कमिशन प्रत्येक महिन्याला पंधरा तारखेपर्यंत वितरित करण्यात येईल असे मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

Officials of Sinnar Taluka Ration Shopkeepers Association participated in the march here.
Nashik News: NDPS कारवाई, तपासाबाबत पोलिसांसाठी कार्यशाळा

रेशन दुकानदार महासंघाचे राज्याध्यक्ष गणपत डोळसे पाटील, कार्याध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष अशोकराव एडके, राज्य प्रतिनिधी सुभाष मुसळे, बाबूराव म्हमाणे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार देखील मोर्चात सहभागी झाले होते.

तालुकाध्यक्ष सतीश भुतडा, शहराध्यक्ष भगवान जाधव, चंद्रकांत माळी, कचेश्वर ढमाले, जगन्नाथ केदार, वसंत पवार, नवनाथ गडाख, दीपक जगताप, संजय भोत, महेंद्र कौठे, कल्पना रेवगडे, सुधाकर मुरकुटे यांनी सरकारकडून येत्या काळात रेशन दुकानदारांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक पावले उचलली जातील असे आश्वासन मिळाल्याचे सांगितले.

Officials of Sinnar Taluka Ration Shopkeepers Association participated in the march here.
Nashik News: साहेब, दुष्काळाने होरपळलो, कांदा निर्यातबंदीने उद्ध्वस्त झालो; पाहणी दौऱ्यावेळी शेतकऱ्यांच्या व्यथा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.