Nashik News : हौसला रखनेवाला, इमानदार सच्चा सैनिक हमने खोया. जो एक सैनिक कि अंदर काबिलीयत होनी चाहीए ओ उनके हर काम में दिनचर्या ॲक्टीविटी में था.
पंधरा साल के सर्व्हिस के अंदर उन्होंने भारत के सभी इलाकोंमे देश कि सेवा करके भारतीय सेना का नाम रोशन किया. (Bhumi Putra Ratan Rajaram Ghule of Jalgaon Neur taluka Yeola is serving in Indian Army death in hospital treatment Nashik News)
असे ५० कमांड आर्मी एव्हियेशन (हेलिकॉप्टर विभाग) चे कर्नल डि.के.चौधरी यांनी श्रद्धांजली पर भाषणात सांगितले. ते पुढे म्हणाले की सैनिक विभागातर्फे जवान रतन गुळे यांच्या कुटुंबाला योग्य ते सहकार्य करण्यात येईल असे आवर्जून सांगितले.
भारतीय सैन्यदलात कार्यरत असलेले जळगाव नेऊर ता.येवला येथील भूमिपुत्र रतन राजाराम गुळे (वय ३५) यांचे मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतांना गुरूवार दि.८ रोजी सकाळी निधन झाले होते.
त्या अगोदर नाशिक आर्टीलरी सेंटर सैनिकी दवाखान्यात दोन दिवस उपचार घेवून पुढील उपचारासाठी मुंबई येथे अश्विनी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
शुक्रवारी सकाळी पार्थिव जळगाव नेऊर येथे आणण्यात आले.सैन्यदलात पंधरा वर्ष सेवा पुर्ण झाल्यानंतर तीन वर्षे सेवा पुन्हा तीन वर्षे सेवा वाढवली होती.२०१३ मध्ये पत्नी सुनिता हीच्या सोबत विवाह झाला होता.
दोघे पती पत्नी मुला बाळांचे स्वप्न बघत असताना झालेल्या निधनामुळे गुळे कुटुंब हादरून गेले. जळगाव नेऊर सैनिकाच्या गावात झालेल्या पहिल्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली. वीर जवान रतन गुळे यांचे पार्थिव त्यांच्या राहत्या घरी अंत्यदर्शनासाठी नेले असता वीरपत्नी सुनिता गुळे हीने कुठे शोधू तुम्हाला हा एकच हंबरडा फोडला.
गुळे वस्तीवर शुक्रवार ता.९ रोजी सकाळी ११.३० वाजता अंत्यसंस्कार कार्यक्रम संपन्न झाला.तहसीलदार आबा महाजन, येवला ग्रामीणचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी श्रद्धांजली वाहीली.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या प्रसंगी आर्मी एव्हियेशन ट्रेनिंग स्कुलचे मेजर सचिन मल्होत्रा, सुभेदार सुशील कुमार, ना.सुभेदार पवन कुमार, हवा.एस. के.पाठक,नायक सुरेश कुमार, सुभाष यादव,के.रामू,सिपाही प्रदीप कुमार, रत्नेश यादव,ओमेंदर तोमर, एस.के.शर्मा,लोकेश सिंग,कुलवेंदर सिंग आदी सैन्यदलातील अधिकारी, कर्मचारी यांनी शासकीय इतमामात मानवंदना दिली.
शिवसेना नेते संभाजी पवार, जि.प.कृषी मा.सभापती संजय बनकर, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन किसनराव धनगे, व्हा.चेअरमन बापू गायकवाड, संचालक वसंतराव पवार,उद्योजक आबा पवार,माजी सभापती प्रकाश वाघ, माजी सरपंच कैलास कुऱ्हाडे, जिल्हा सैनिक कल्याणचे नवनाथ दाणे, येवला तालुका सैनिक ग्रुपचे सुशील शिंदे व त्यांचे सहकारी, सेवारत, आजी- माजी सैनिक, लक्ष्य डिफेन्स अकॅडमीचे संचालक निवृत्त सुभेदार आनंद गुंड, अकॅडमीचे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, जळगाव नेऊर पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
मुखेड फाटा ते जळगाव नेऊर ,जळगाव नेऊर ते गुळे वस्ती असे सहा किमी अभिवादन रॅली काढून मानवंदना दिली.रस्त्यावर आकर्षक रांगोळी, फुलांचा वर्षाव करण्यात आला होता.वीर जवान तुझे सलाम,अमर रहे अमर रहे या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले होते.डिजेचा सुमधुर आवाज, सजविलेला रथ, उन्हाचे चटके सोसत स्वयंस्फूर्तीने गर्दीचा उच्चांक जमा झाला होता.
जळगाव नेऊर ग्रामपंचायत, गावातील युवा वर्ग,प्रकाश शिंदे,आत्माराम शिंदे, येवला तालुका आजी माजी सैनिक ग्रुप तसेच जळगाव नेऊर लक्ष्य डिफेन्स अकॅडमीचे संचालक निवृत्त सुभेदार आनंद गुंड यांचे मार्गदर्शनाखाली अकॅडमीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी रॅलीत सहभागी होऊन दोन दिवस पुर्ण वेळ मदतीसाठी तत्पर होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.