Nashik Crime News : आदिवासी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी भुवन येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल सुरेश तायडे यांचे निलंबन झाल्यानंतर याच शाळेतील महिला अधीक्षिकेवर देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून अधीक्षिका प्रियंका दीपक उके यांच्याविरोधात नाशिकचे प्रकल्प अधिकारी जितीन रहमान यांनी निलंबनाचा बडगा उगारला आहे. एकाच शाळेतील पुरुष-महिला अधीक्षक निलंबित झाल्याने आश्रमशाळा, तसेच वसतिगृहांच्या अधीक्षकांचे धाबे दणाणले आहे. (Bhuvan Government Ashram School Superintendent Superintendent Suspension Abused Nashik Crime News)
आदिवासी विकास विभागाची भुवन येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा असून, तिथे राहुल तायडे अधीक्षक (पुरुष) या पदावर कार्यरत होता. गत आठवड्यात तायडे याने सातवीत शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीसोबत गैरवर्तन केले होते.
या प्रकरणी नाशिक प्रकल्प कार्यालयाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर चौकशी समितीसह सहाय्यक प्रकल्प अधिकारी स्नेहल गायकवाड यांच्या नेतृत्वात विशाखा समितीने पीडितेची भेट घेऊन जबाब घेतला. चौकशी समितीने अहवाल नाशिक प्रकल्प अधिकाऱ्यांना सादर केला.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
या अहवालात अधीक्षक तायडे याने पीडितेसोबत गैरवर्तन केले. समितीने शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस केल्याने तायडेचे दोन दिवसांपूर्वी निलंबन करण्यात आले आहे. यातच आदिवासी विद्यार्थिनींच्या गैरवर्तनाचा गंभीर प्रकार असताना उके या रजेवर गेल्याने त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केली होती.
अधीक्षिका उके यांच्या कर्तव्यशून्य कारभारामुळे पीडितेला गैरवर्तनासारख्या गंभीर घटनेला सामोरे जावे लागले. त्यामुळे उके यांच्याविरोधात शिस्तभंगाच्या कार्यवाहीची शिफारस समितीने केली होती. त्याआधारे नाशिकचे प्रकल्प अधिकारी रहमान यांनी उके यांचे निलंबन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.