Pitru Paksha 2023: पितृपक्षात फुलांच्या मागणीत मोठी घट!

flowers
flowersesakal
Updated on

Pitru Paksha 2023 : गणेशोत्सवाच्या काळात मोठी मागणी असलेल्या सर्वच प्रकारच्या फुलांच्या मागणीत पितृपक्षात मोठी घट झाली आहे. मागणी नसल्याने थेट गोदापात्रापर्यंत भरणारा फूल बाजार गत चार दिवसांपासून चांगलाच रोडावला आहे.

आता घटस्थापनेनंतरच फुलांच्या मागणीत पुन्हा वाढ होऊन बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. (Big drop in flower demand during Pitru Paksha nashik)

गुलशनाबाद म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या फूल बाजाराची स्वतंत्र ओळख आहे. पूर्वी सराफ बाजार भरणारा हा बाजार गणेशवाडी भागात स्थलांतरित झाल्यावर चांगलाच बहरला आहे.

शहर परिसरासह थेट संगमनेर, नारायणगाव, आळेफाटा, चांदवड, दिंडोरी तालुक्यातून मोठी आवक होते. त्याद्वारे लाखो रुपयांची उलाढालही होते. सध्या पितृपक्षात कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने फूल बाजार आकसला आहे.

सण- उत्सवाच्या काळात तर सकाळी पाय ठेवायलाही जागा नसते, यावरून या बाजाराची कल्पना यावी. परंतु सध्या कोणत्याच फुलांना मागणी नसल्याचे विक्रेते सांगतात.

तपोवनातील क्षेत्र घटले

पूर्वी तपोवन, हिरावाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर फूल शेती होती. आता या भागातील शेतकऱ्यांचा कल झेंडूऐवजी बुकेसाठी लागणाऱ्या गुलछडी, ॲस्टर, कामिनी आदींकडे वळली आहे.

flowers
Pitru Paksha 2023 : पितृपक्षात श्राद्ध पूजेसाठी बनवा ही खास चविष्ट खीर, लगेच नोट करा रेसिपी

पुणे जिल्ह्यासह नाशिकच्या ग्रामीण भागातूनही मोठ्या प्रमाणावर झेंडूच्या फुलांची आवक होते, त्यामुळे येथील शेतकऱ्यांकडून इतर फुलांच्या लागवडीस पसंती दिली जात आहे.

जास्त पाऊस, नदीकाठामुळे असलेले धुके व करपा रोग यामुळे शेतकरी इतर फुलांकडे वळाल्याचे संजय पवार या फूल उत्पादक शेतकऱ्याने सांगितले.

ग्रामीण भागातून आवक

शहरात फुलांची आवक नाशिक तालुक्यासह चांदवड, दिंडोरी, निफाड भागातून मोठ्या प्रमाणावर होते. याशिवाय नगर जिल्ह्यातील संगमनेर, पुणे जिल्ह्यातील घारगाव, आळेफाटा, नारायणगाव आदी भागातूनही मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होते.

आता नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला म्हणजे घटस्थापनेपासून फुलांच्या आवकेत मोठी वाढ होईल, असा अंदाज आहे. दसऱ्यानंतर थेट दिवाळीपर्यंत फुलांना मोठी मागणी असते.

flowers
Pitru Paksha 2023 : अनेक भागात काकस्पर्श झाला दुर्मिळ; पितरांना घास देण्यासाठी स्मृतिवन उद्यानाजवळ उसळतेय गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.