Nashik Agriculture News: गळीत हंगामाची यंदा अग्नीपरीक्षा; पावसाअभावी उत्पादनात घट

A sugarcane field crowded with cuttings
A sugarcane field crowded with cuttings
Updated on

Nashik Agriculture News : यंदा पावसाने ओढ दिल्याने सरासरी पेक्षा १२५ मिलिमीटर कमी पावसाची नोंद निफाड तालुक्यात झाली आहे. त्यामुळे गोदाकाठ परिसरात उसाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. क्षेत्र घटल्याने उसाची पळवापळवी व दराची स्पर्धा होणार असल्याचे चित्र तालुक्यात आहे.

त्याचा परिणाम एरवी पहिला हप्ता दोन हजारांच्या दरम्यान सांगणारे कारखानदार आता स्वतः:हून दोन हजार ५०० रुपये प्रतिटनाला भाव जाहीर करू लागले आहेत. क्षेत्र व उत्पादनात घट होणार असल्याने साखर कारखान्यांना ऊस उपलब्धतेचा प्रश्‍न सतावणार आहे.

साहजिकच यंदा गळीत हंगाम कारखान्यासाठी अग्नीपरिक्षा ठरणार आहे. (Big drop in sugarcane production due to lack of rain nashik news)

गोदाकाठ परिसर हे उसाचे माहेरघर आहे. निफाड तालुक्यात सरासरी ९ हजार एकरावर सुरू उसाचे क्षेत्र असते. निफाड तालुक्यात ५५० मिलिमीटर पावसाची सरासरी नोंद होते. वरुणराजा यंदा रूसल्याने त्यात २० टक्के घट होऊन ४२५ मिलिमीटर पाऊस बरसला.

त्याचा थेट परिणाम शेतीपिकावर झाला आहे. पाण्याचे पीक म्हणून ओळख असलेल्या उसाच्या क्षेत्रात व उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यातून कारखान्यापुढे हंगाम पार पाडण्याची चिंता सतावणार आहे. गतवर्षी पर्यत ऊसतोडणीसाठी शेतकऱ्यांना कारखानदारांच्या विनवण्या कराव्या लागत होत्या.

ऊस तोडणीसाठी मुकादम यांनी एकरी पाच ते दहा हजार रुपये देण्याची वेळ शेतकऱ्यांवर होती. यंदा मात्र उलट चित्र दिसण्याची शक्यता आहे. ऊस देता का ऊस असे म्हणण्याची वेळ कारखान्यांवर येण्याची शक्यता आहे.

उसाची टंचाई भासणार

आमदार दिलीप बनकर यांच्या नेत्तृत्वाखालील रानवड साखर कारखान्याने २ हजार ५०० रूपये टन भाव जाहीर केला. तर कादवा, द्वारकाधीश आणि नगर जिल्ह्यातील मधील अगस्ती (अकोले), संजीवनी (कोपरगाव), संगमनेर यांनीही जवळपास याच दरम्यान दर जाहीर केले आहे.

A sugarcane field crowded with cuttings
Nashik Agriculture News: भात कापणीसाठी मजूर मिळेना! शेतकऱ्यांना महागडी यंत्रे न परवडणारी

क्षेत्र व वजन घटल्याने ऊस मिळविण्याची मोठी स्पर्धा कारखान्यामध्ये दिसणार आहे. वजन घटण्याची शक्यता असल्याने साखर उताराही घटणार आहे. सर्वच कारखान्यांना उसाची टंचाई भासणार आहे.

उपपदार्थ प्रकल्पांच्या अडचणीत वाढ

गळीत हंगाम यंदा डिसेंबरच्या अखेरीस किंवा जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ऊस न मिळाल्यास साखर गाळप बरोबरच उपपदार्थ प्रकल्प कसे चालवायचे हे ही मोठे आव्हान कारखान्यापुढे असेल. ऊस उत्पादक व कारखान्यांना आर्थिक जळ बसण्याची भीती आहे. जागतिक बाजारपेठेत साखरेचे भाव वधारत आहे. परंतु अपेक्षित साखर उत्पादन होणार नसल्याने त्याचा फायदा होणार नाही.

"उत्पादित साखर देशांतर्गत वापरासाठीच लागणार आहे. त्यामुळे निर्यातीला वाव नाही. निवडणुका तोंडावर असल्याने साखरेचे भाव नियंत्रणात राखले जाणार असल्याची शक्यता आहे. ही स्थिती साखर कारखान्यांना आव्हानात्मक आहे. तरीही रासाकाकडून शेतकऱ्यांना सर्वोत्तम भाव देण्याचा प्रयत्न असेल." -आमदार दिलीप बनकर

"यंदा उसाचे क्षेत्र घटले आहे. उसाची पळवापळवी होण्याची शक्यता आहे.नवीन लागवडीसाठी एकरी बेणे खर्च, मशागत, लागवड, रासायनिक खते असा ५० हजार रुपयापर्यंत खर्च येतो. एकरी उत्पादन ४० टनांच्या आत आहे. वर्षभर पिकाला पाणी भरावे लागते. पहिली उचल साडेतीन हजार मिळावी." - धोंडूमामा भगुरे (करंजगाव)

A sugarcane field crowded with cuttings
Nashik Agriculture News: जिल्ह्यात रब्बीची केवळ 8 टक्के पेरणी; 1 लाख 14 हजार 249 हेक्टर क्षेत्र निश्चित

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.