Nashik News : कुत्रा आडवा आल्याने दुचाकी घसरली; चिमुकलीचा मृत्यू

Child Death
Child Deathesakal
Updated on

नाशिक : औरंगाबाद रोडने दुचाकीवरून जात असताना भटका कुत्रा आडवा आला. त्यामुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये दोनवर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दिव्यांश्री मनोज घुमरे, असे मृत चिमुकलीचे नाव आहे. तर दुसऱ्या अपघातामध्ये भरधाव वेगातील कार झाडावर धडकून तरुणांचा मृत्यू झाला. (bike skidded as dog came across Death of child Nashik Latest Marathi News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Child Death
Nashik News: पूर्व विभागात 3 वर्षाच्या तुलनेत 2021 मध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद

मनोज घुमरे (रा. कोणार्कनगर, पंचवटी) हे त्यांची पत्नी दीपाली व दोनवर्षीय मुलगी दिव्यांश्री यांच्यासमवेत दुचाकीवरून नांदूर नाक्याकडे जात होते. नांदूर नाक्यावर मनोज काही कामानिमित्ताने थांबले आणि दुचाकीवरून पत्नी दीपाली व दिव्यांश्री हे घराकडे निघाले. त्या वेळी बांबूंज्‌ हॉटेलजवळ अचानक त्यांच्या भटके कुत्रे आडवे आले. त्या वेळी दीपाली यांनी ब्रेक मारले असता दुचाकी घसरली. या अपघातामध्ये दोघीही रस्त्यावर पडल्याने दोघींना दुखापत झाली. परंतु दिव्यांश्रीला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले असता, मृत घोषित केले. याप्रकरणी आडगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तर, दुसऱ्या अपघातामध्ये भरधाव कार झाडावर धडकून तरुणाचा मृत्यू झाला. कारचालक चैतन्य विसावे व आदित्य देविदास पगारे (रा. बोधलेनगर) हे दोघे मित्र रात्री कारने (एमएच- १५- एएक्स- ०११४) महात्मानगर येथून जेहान सिग्नलकडे जाताना चालकाचे नियंत्रण सुटले. यामुळे कार थेट आशियाना बंगल्यासमोरील झाडावर आदळली. या अपघातात चालकाशेजारी बसलेल्या पगारे याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी चालक विसावे याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महात्मानगर भागात हा अपघात झाला आहे.

Child Death
MHT- CET Exam : अकरावीचे 20, बारावीचे 80 टक्‍के प्रश्‍न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.