सटाणा (जि. नाशिक) : शहरापासून आठ ते दहा किलोमीटर अंतरावरील मुळाणे, कौतिकपाडे, तरसाळी आदी परिसरातील बिलोंड्या आणि सातपायऱ्या डोंगररांगांना आग लागल्याने परिसरातील वनविभागाच्या हद्दीत असलेले १५ हेक्टर वनक्षेत्र जळून खाक झाले.
या आगीत मोठ्या प्रमाणात वन्यजीव, प्राणी, वनसंपदेची मोठी हानी झाली. रात्रीच्या सुमारास अग्नीच्या ज्वाला सटाणा शहरासह परिसरातील सर्व गावांमधून दिसत होत्या. दरम्यान, रात्री उशिरा अनेकांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात यश आले. (Billondya fire in hill ranges of Satpayara 15 hectare of forest area in Baglan taluk taken Nashik News)
मंगळवारी (ता.४) सायंकाळी मुळाणे, कौतिकपाडे, तरसाळी, या परिसरातील बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगरांना आग लागली. त्यानंतर वाऱ्याच्या वेगाने ही आग झपाट्याने संपूर्ण जंगल परिसरात पसरली. आगीने रौद्ररूप धारण करून संपूर्ण डोंगराला कवेत घेतले. यामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष, गवत, पालापाचोळा यांसह पक्षी व सरपटणाऱ्या प्राण्यांची जीवितहानी झाली.
वनविभागाला आगीचे वृत्त समजताच वनक्षेत्रपाल पी.बी.खैरणार यांच्यासह वनविभागाचे कर्मचारी, मजूर आणि सटाणा पालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. वनविभागाच्या फायर ब्लोअर, अग्निशमन बंब व परिसरातील नागरीकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केलेत. रात्री उशिरापर्यंत बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगराला लागलेली आग धुमसत होती.
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
हवेच्या वेगामुळे आगीने रौद्ररूप धारण केले. सुमारे १५ किलोमीटर अंतरापर्यंत आगीचे लोळ दिसून येत होते. आगीमुळे कौतिकपाडे, तरसाळी, मुळाणे आदी गावांमध्ये घबराटीचे वातावरण होते. या डोंगरांवर बिबट्या, लांडगे यासारख्या वन्यप्राण्यांसह शेकडो मोरांचे वास्तव्य आहे. रात्री उशिरा अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.
बुधवारी (ता.५) सकाळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून बिलोंड्या व सातपायऱ्या डोंगराची पहाणी करुन पंचनामा करण्यात आला. तालुक्यातील निसर्ग व पशुपक्षी प्रेमींनी घटनास्थळाला भेट देऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्याचे सौंदर्य असलेल्या डोंगरांना आगी लागणार नाहीत आणि त्यात निसर्गासह पशुपक्ष्यांची जीवितहानी होणार नाही, यासाठी डोंगरांना सुरक्षा कवच पुरविण्याची मागणी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.