SAKAL Impact : पक्षी ‘रिटर्न मायग्रेशन'नंतर अभयारण्यात! पानवेली काढण्याच्या कामाला सुरवात, टायफा हटविणार

Panveli removal work started in Nandoormadhmeshwar bird sanctuary.
Panveli removal work started in Nandoormadhmeshwar bird sanctuary.esakal
Updated on

SAKAL Impact News : नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी पानवेलीमय झाल्याचे वृत्त ‘सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर वन विभागाने पानवेली काढण्याच्या कामाला सुरवात केली. पक्ष्यांचे ‘रिटर्न मायग्रेशन' सुरु झाल्याने अभयारण्यातील पक्षांची संख्या कमी झाली आहे. (Birds in sanctuary after return migration nandurmadhyameshwar Panveli removal work begins typha will removed SAKAL Impact nashik news)

नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी पानवेलीमय झाल्याचे वृत्त ‘सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाले होते
नांदूरमधमेश्‍वर पक्षी अभयारण्यातील गोदावरी पानवेलीमय झाल्याचे वृत्त ‘सकाळ' मध्ये प्रसिद्ध झाले होतेesakal

गोदावरीमधील पानवेली काढण्याच्यादृष्टीने सरकारी यंत्रणांमधील समन्वयाच्या अभावामुळे वन विभागाने पानवेली काढण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यात अभयारण्यात कामे करता येत नसल्याने उन्हाळ्यामध्ये कामे करावी लागणार आहे.

टायफा वनस्पती मोठ्याप्रमाणात वाढली असल्याने ती काढण्यासाठी यंत्राचा वापर केला जाणार आहे. या कामांमध्ये पक्षी अभ्यासकांची मदत घेण्यात येणार आहे. कामे करताना पक्षांना हानी पोचणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. ‘रेस्क्यू सेंटर’, मासेमारी क्षेत्र ही कामे सुद्धा केली जाणार आहेत.

अभयारण्यातील कामे करण्यासाठी ‘मॉनिटरिंग कमिटी'ची स्थापना करण्यात येणार आहे. शिवाय ‘नेचर ट्रेल’ पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. त्याचवेळी ‘रोटेशन’ पद्धतीने गाईडला रोजगार दिला जाणार आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Panveli removal work started in Nandoormadhmeshwar bird sanctuary.
Currency Note Press: प्रेसचा चेहरामोहरा लवकरच बदलणार; जपान, ऑस्ट्रियामधून 12 अत्याधुनिक मशिन खरेदी

अभयारण्यात डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना राबवली जाणार आहे. पाणथळ स्थळी अभयारण्याचे फलक लावले जातील. संरक्षक पथकाला ‘ड्रेस कोड' आणि ‘पेट्रोलिंग' वाहन ही व्यवस्था केली जाणार आहे.

"हिवाळ्यातील स्थलांतरित पाहुण्यांच्या आगमनाअगोदर अभयारण्यातील विकासकामे करावी लागतील. पानवेली आणि टायफा काढण्याचा निर्णय घेतला असून पानवेली काढण्यास सुरवात झाली."- शेखर देवकर, वन परिक्षेत्र अधिकारी

"पावसाळ्यानंतरच्या हिवाळ्यात अभयारण्यात दाखल होणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांना खाद्य मिळावे म्हणून वन विभागातर्फे कामे सुरु करण्यात आली आहेत. पानवेलीसह टायफा काढण्यात येणार आहे."- अमोल दराडे, गाइड

Panveli removal work started in Nandoormadhmeshwar bird sanctuary.
Chandrakant Patil Controversy : चंद्रकांत दादा पाटील यांना थेट आव्हान देतोय हा 'शिवसैनिक'!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()