Nashik News : आदिवासी विकास विभागातील राज्यभरातील रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचा मुंबईकडे निघालेला बिऱ्हाड मोर्चा बुधवारी (ता. १४) इगतपूरीत मुक्कामी स्थिरावला. (Birhad Morcha stay in Igatpuri Drove to Mumbai for various demands regardless of rain or shine Nashik News)
नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानापासून विविध मागण्यांसाठी मंगळवारी (ता. १३) या बिऱ्हाड मोर्चाला सुरवात झाली. बुधवारी दुपारी मोर्चेकरी वाडीवऱ्हे येथे व त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी पाडळी येथील एका शेतात थांबले होते.
शाळेतील आणि वसतिगृहातील रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांचा या मोर्चात सहभाग असून, आदिवासी विकास विभागाने जारी केलेला शासन निर्णय रद्द करावा. दहा वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागेवर बाहेरील कर्मचाऱ्यांना घेऊ नये.
वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचाऱ्यांना दहा वर्षे पूर्ण होईपर्यंत शासन सेवेत संरक्षण देण्यात यावे. त्यांना सेवेतून कमी करू नये, अशा प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. विशेष म्हणजे बुधवारी दुपारच्या सुमारास काही वेळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्यामुळे मोर्चेकरी चिंब भिजले होते. महिला, लहान मुले व अपंग युवकांचा मोठा सहभाग या मोर्चात आहे. बुधवारी रात्री बिऱ्हाड मोर्चा महामार्गावरील आयटीआयमधे मुक्कामी असून, गुरुवारी (ता. १५) सकाळी मुंबईकडे कुच करणार आहे.
सीटुचा पाठिंबा
बिऱ्हाड मोर्चाबाबत आपला निर्धार कायम ठेवत, मोर्चेकरी भर ऊन्हात मुंबईकडे पायी वाटचाल करीत आहेत. बुधवारी (ता. १४) सायंकाळी सातला घोटी टोल नाका येथे सिटूतर्फे मोर्चात सहभागी कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत पाठिंबा दर्शविण्यात आला.
सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रद्धा गंधास यांनी आपल्या पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता. समितीच्या राज्यध्यक्षा रुपाली काहांडोळे, सिटूचे जिल्हा नेते देविदास आडोळे, तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, आप्पा भोले, सुनील मालुंजकर आदिंसह मोर्चेकरी या वेळी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.