जुने नाशिक : महापालिका पूर्व विभागात २०२२ च्या तुलनेत २०२३ वर्षात जन्मदरात सुमारे १ हजारांने वाढ झाली आहे.
तर मृत्यूदर लक्षात घेतले तर सुमारे ६०० घट झाली आहे. आकडेवारी बघता २०२३ वर्ष जन्माचे ठरले आहे. (Birth rate increased death rate decreased in East Division of Nashik NMC News)
कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या तीन वर्षात मृत्यूचे प्रमाण वाढले होते. तर जन्मदर काही अंशी घटले होते. २०२३ वर्ष २०२२ च्या तुलनेत जन्मदर वाढण्यासाठी अनुकूल ठरले.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत ७ हजार ९२५ जन्म नोंदणी करण्यात येऊन दाखले वाटप करण्यात आले होते. १ जानेवारी ते २९ डिसेंबर २०२३ पर्यत ९ हजार १४६ जन्म नोंदणी झाली. २०२२ वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये १ हजार २२१ ने जन्मदर वाढला आहे.
मृत्यूच्या दरात मात्र २०२२ वर्षाच्या तुलनेत २०२३ मध्ये मृत्युदराचे प्रमाण सुमारे ५७४ ने घटले आहे. वर्ष २०२२ मध्ये ४ हजार ९०८ तर २०२३ वर्षात ४ हजार ३३४ मृत्यूची नोंद झाली आहे.
या दोन्हीही आकडेवारी लक्षात घेतल्या तर २०२३ वर्ष जन्मदर वाढण्यासाठी अनुकूल ठरले आहे. असे स्पष्ट होत आहे.
विभागीय कार्यालयाकडून नोंद झालेल्या सर्वांना दाखले वाटप करण्यात आले आहे. यातून विभागास हजारोंचा महसुल प्राप्त होऊन महापालिका तिजोरीत भर पडली आहे.
दाखल्याचे डिजिटायझेशन
महापालिकेकडून विभागीय कार्यालयांमार्फत संबंधित विभागात नोंद केलेल्या नागरिकांना जन्म, मृत्यूचे दाखले उपलब्ध करून दिले जाते. दाखल्याचा कागद अतिशय साधा असल्याने फाटणे, कुजणे, खराब होणे अशा प्रकारची अडचण येत असते.
असे प्रकार टाळण्यासाठी दोन्ही दाखल्याचे डिजिटायझेशन करण्यात आले आहे. अर्थात दाखल्यांवर क्यूआरकोड प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे.
क्यूआरकोड स्कॅन करताच नागरिकांना घरबसल्या रंगीत दाखले मिळण्यास मदत होत आहे. याशिवाय देशात कुठेही गेले तरी स्कॅन केल्यामुळे दाखले मिळणे सोयीचे होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी सोय झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.