: २०१९ विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाच्या पटलावर सातत्याने उलथापालथ सुरू आहे. या राजकीय उलथापालथीचा थेट परिणाम नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघावर फारसा होणार नाही, असे सद्यःस्थितीत चित्र आहे.
असे असले तरीही सत्ताधारी भाजपतील वाढती चुरस पाहता ऐनवेळी नाराजांनी पक्ष बदल केले तर मात्र भाजपसमोर आव्हान उभे राहू शकते. दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान दोन्ही गटांकडे हुकमी चेहरा नसल्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. (BJP Both Shiv Sena Nationalist congress groups have no face Nashik Political)
मात्र, भाजप, शिंदे-गट, अजित पवार- गट या तिघांनी एकत्रित निवडणुका लढवली तर मात्र भाजपचाच वरचष्मा या मतदारसंघात राहण्याचीच शक्यता अधिक आहे. भाजपच्या प्रभावाखालील मतदारसंघ असला तरी या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना मानणारा मोठा वर्गही याच मतदारसंघात आहे हे विसरून चालणार नाही.
२०१४ विधानसभा निवडणुकीत भाजपचे बाळासाहेब सानप हे मोदी लाटेत निवडणूक आले होते. मात्र, २०१९ मध्ये त्यांना भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारली आणि मनसेतून दाखल झालेल्या ॲड. राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली.
सानप यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी करीत निवडणूक लढविली. त्या वेळी ॲड. ढिकले विजयी झाले तर, दुसऱ्या क्रमांकाची मते सानप यांना मिळाली होती. त्या वेळी कॉंग्रेस, शिवसेना आणि मनसेचे उमेदवार मोठ्या फरकाने मागे पडले होते.
त्यामुळे भाजपचा मतदारसंघ असला तरीही या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादाचाही प्रभाव कायम आहे. सद्यःस्थितीत भाजपचे विद्यमान आमदार ॲड. राहुल ढिकले आहेत. मात्र, येत्या विधानसभा निवडणुकीचा बिगूल वाजला तर, भाजपकडूनच त्यांना तीव्र चुरशीला सामोरे जावे लागू शकते.
मनपाचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गिते, सुनील केदार, माजी आमदार बाळासाहेब सानप, अरुण पवार, उद्धव निमसे, दिनकर आढाव यांनीही ‘आमदारकी’ साठी कंबर कसली आहे.
यातून कोणाला उमेदवारी मिळते की पुन्हा ढिकले यांना ‘चाल’ दिली जाते यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. परंतु तसे झाले तर उमेदवार न मिळाल्याने नाराज झालेले इतर पक्षाकडे जाऊ शकतात. कारण, इतर कोणत्याही पक्षाकडे हुकमी चेहरा नाही.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
साहेबांचाच प्रभाव
नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात शहरासह, शेतमळ्यांचा आणि सर्वसामान्य कामगार- कष्टकरी, नोकरदार मतदार आहेत. दोन विधानसभेपासून याठिकाणी भाजपचे प्राबल्य वाढलेले आहे.
असे असले तरीही राष्ट्रवादीचे शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग याच मतदार संघात आहे. नाशिक बाजार समिती राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांच्या ताब्यात असून, ते शरद पवार यांचे खंदेसमर्थक मानले जातात.
तर कोंडी होणार
भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गटाने एकत्रित निवडणूक लढविण्याची तयारी केली तर, पूर्व विधानसभा मतदारसंघ भाजपच्या वाट्याला आहे. अशावेळी या ठिकाणी शिंदे गटातील इच्छुक राजेंद्र लवटे, अजित पवार यांच्या गटाचे निवृत्ती अरिंगळे व दिलीप खैरे यांची कोंडी होऊ शकते.
जर, ढिकले यांनाच उमेदवारी दिली गेली तर गणेश गिते, सुनील केदार, बाळासाहेब सानप, अरुण पवार, उद्धव निमसे, दिनकर आढाव हे वेगळी वाट निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ठाकरे गटाकडून दत्ता गायकवाड तर काँग्रेसकडून पुन्हा डॉ. शोभा बच्छाव, शरद आहेर, राजाराम पानगव्हाणे, गणेश उन्हवणे यांचीच नावे येऊ शकतात. तर शरद पवार यांच्याकडेही नवीन चेहरा नसला तर देविदास पिंगळे असू शकतात. पण कोंडी सर्वांचीच.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.