Nashik BJP News : विशिष्ठ समाजातील व्यक्तींकडून गैरप्रकार केले जात असतील तर त्याविरोधात हिंदू समाजाने जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठविणे गैर नाही, असा दावा राज्यातील शिवसेना-भाजप युतीच्या सत्ताकाळात कुणीही असुरक्षित नाही. (BJP Chief State Spokesperson Keshav Upadhyay statement about riot nashik news)
काही ठिकाणी दंगलींच्या माध्यमातून सत्ता गेलेल्यांची तडफड दिसत आहे, आजपर्यंत दंगलींच्या नावावर राजकीय पोळ्या कुणी भाजल्या याचा इतिहास जयंत पाटील यांनी तपासावा, असा सल्ला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिला.
भाजप सरकारच्या नऊ वर्षपूर्तीनिमित्त महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. त्यानिमित्ताने भाजपच्या वसंतस्मृती कार्यालयात माध्यमांशी ते बोलत होते.
राज्यात काही ठिकाणच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून सामाजिक सलोखा बिघडविण्याचे काम जाणीवपूर्वक होत असल्याचा आरोप केला, त्याला उत्तर देताना उपाध्ये म्हणाले, जयंत पाटील यांनी दंगलींचा इतिहास तपासावा.
हिंदू जनजागरण मोर्चाचे समर्थन करताना विशिष्ठ समाजातील व्यक्तींकडून गैरप्रकार केले जात असतील मोर्चे निघतीलचं, असे स्पष्टीकरण दिले.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
शेतकर्यांना अधिक दर देवून न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. कांदा खरेदीसाठी नाशिकमध्ये एनसीसीएचे केंद्र उभारले आहे. केंद्र सरकारची मागील नऊ वर्षांची कारकीर्द स्वातंत्र्यानंतर तेजस्वी ठरली आहे.
शासन व्यवस्थेला ‘सुशासन व्यवस्थे’त बदलण्यात आले आहे. सरकारने आठशेहून अधिक योजना अमलात आणून त्यांना नवा आकार दिला. यावेळी सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण, प्रदेश माध्यम विभागप्रमुख नवनाथ बन, शहराध्यक्ष गिरीष पालवे, आ. देवयानी फरांदे, लक्ष्मण सावजी, प्रदीप पेशकार, गोविंद बोरसे, जगन पाटील, अविनाश पाटील, सुजाता करजगीकर, ज्योती चव्हाणके आदी उपस्थित होते.
देशात पुन्हा मोदी, राज्यात उत्तम काम
विरोधकांकडून परिवर्तनाचा दावा पोकळ आहे. यापुर्वी सन २०१९ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परिवर्तनाचा नारा दिला होता, मात्र केंद्रात पुन्हा भाजपचीच सत्ता आली. आता पुन्हा २०२४ च्या निवडणुकीत सत्ता येईल. राज्यात शिवसेनेच्या शिंदे गटा प्रती कुठलीचं नाराजी नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचे काम उत्तम आहे. महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.