NAMCO Bank Election: नामकोच्या निवडणुकीत भाजपने घातले लक्ष; स्वतंत्र पॅनेल बनविण्याच्या हालचाली

BJP is preparing to enter Nashik Merchant Bank election News
BJP is preparing to enter Nashik Merchant Bank election News
Updated on

NAMCO Bank Election: राजस्थान, मध्यप्रदेशसह छत्तीसगडमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय जनता पक्षाने जिल्ह्यातील सर्वात मोठी बॅक असलेल्या नाशिक मर्चंट बॅंकेच्या निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी केली आहे.

या निवडणुकीत पॅनेल तयार करताना भाजपशी संबंधित उमेदवारांचाच समावेश करण्याबरोबर भाजपचेच उमेदवार निवडून आणण्यासाठी तयारी केल्याचे बोलले जात आहे. नाशिक मर्चण्टस बॅंकेच्या निवडणुकीचा ज्वर आता वाढताना दिसत आहे. (BJP is preparing to enter Nashik Merchant Bank election News)

काही दिवसांपूर्वी लोकसभेची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या छत्तीसगढ, राजस्थान, मध्य प्रदेश या राज्याच्या विधानसभेची मतमोजणी झाली. त्यात भाजपला यश मिळाल्याने आता लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के विजयासाठी भाजपकडून छोट्या निवडणुकांकडेही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक मर्चंट बॅंकेच्या निवडणुकीकडे पाहिले जात आहे. नामकोचे बहुतांश सभासद व्यापारी वर्गातील आहे. व्यापारी वर्ग हा भाजपचा पारंपरिक मतदार असल्याने नामकोची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची आहे. त्यात मध्य विधानसभा मतदारसंघात बहुतांश सभासद वास्तव्याला असल्याने धोकादायक स्थितीत असलेल्या या मतदारसंघावर पकड भक्कम करण्यासाठी नामको निवडणुकीचा आधार घेतला जात आहे.

नामकोच्या निवडणुकीसाठी भाजपतर्फे सध्या पॅनेल तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यात पक्षाचा संबंध येत नसला तरी भाजपचे लेबल लावून मतदारांमध्ये विशेष संदेश देण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील असल्याचे बोलले जात आहे. सध्या कागदावर मजबूत स्थितीत असलेल्या व पॅनेल तयार करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या गटात सर्वपक्षीय इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षविरहीत निवडणूक ठेवण्याकडे कल असल्याचे बोलले जात आहे.

BJP is preparing to enter Nashik Merchant Bank election News
NAMCO Bank Election: बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली! 21 जागांसाठी विक्रमी 272 उमेदवारी अर्ज दाखल

सत्ताधारी देणार सहा संचालकांना डच्चू

नाशिक मर्चंट बँकेच्या निवडणुकीत सत्ताधा-यांसह विरोधी पॅनलकडून जुळवाजुळव सुरू असून सत्ताधारी पॅनलकडून 5 ते 6 उमेदवारांना डच्चू दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यांना माघारीसाठी सत्ताधारी गटाने काही लोकांवर जबाबदारी सोपविली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे डच्चू मिळणारे उमेदवारीसाठी दुसरीकडे अन्यत्र फिल्डींग लावत असल्याचे बोलले जात आहे. ठराविक उमेदवारीसाठी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांकडून दबाव असल्याचे समजते.

कुणाला घ्यावे अन टाळावेची रणनीती

अर्ज माघारीच्या दुसऱ्या दिवशी माघारीचा आकडा अकरावर पोचला. आता निवडणूक रिंगणात २१ जागांसाठी १६१ उमेदवार आहेत. उमेदवारांची माघारी सुरू असताना पॅनेल निर्मितीसाठी हालचाली गतिमान झाल्या. सत्ताधारी गटाकडून उमेदवारी निश्चितीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे.

सत्ताधारी पॅनेलमध्ये उमेदवारी मिळावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून देखील दबाव टाकला जात आहे. भाजपकडून काही ठराविक उमेदवारांच्या नावासाठी आग्रह सुरू आहे. काही उमेदवारांना घेऊ नये यासाठी देखील दबावतंत्राचा वापर होत आहे. सत्ताधारी पॅनलला टक्कर देण्यासाठी विरोधी पॅनेलकडूनही हालचाली सुरू आहेत. उमेदवार निश्चितीसाठी येत्या दोन ते तीन दिवसात बैठक बोलविली असल्याचे विरोधी पॅनेलकडून सांगण्यात येत आहे.

BJP is preparing to enter Nashik Merchant Bank election News
NAMCO Bank Election: नामको बँकेसाठी पॅनेल निर्मितीच्या हालचाली; 172 उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.