Nashik Political News: राज्यपाल नियुक्त आमदारासाठी भाजप, NCPच्या नेत्यांची चर्चा

दिनकर पाटील, सावजी, पिंगळे, साने, नीलिमा पवार यांची नावे अग्रेसर
NCP and bjp party
NCP and bjp partyesakal
Updated on

Nashik Political News : पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्षांकडून नाशिक व दिंडोरीमधून उमेदवार कोण, याची चर्चा सुरू असताना राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरील स्थगिती उठविण्यात आल्याने आता राज्यपाल नियुक्त आमदारासाठी नाशिकमधून चर्चा सुरू झाली आहे.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी यांच्यासह महापालिकेचे माजी सभागृह देते दिनकर पाटील यांचे नाव भाजपकडून चर्चेत आले; तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

‘मविप्र’च्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांच्यासह विजय साने यांचेही नाव चर्चेत आले. (BJP NCP leaders discuss for governor appointed MLA Nashik Political News)

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शासनाकडून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

मात्र, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवरून पायउतार होईपर्यंत कोश्यारी यांनी राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे जाहीर केली नाहीत, या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाली.

राज्य शासनाकडून शिफारस करण्यात आलेल्या १२ आमदारांच्या यादीत नाशिकमधून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, तर राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांच्या नावाचा समावेश होता.

त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये उत्तर महाराष्ट्राला दोन पदे मिळाली होती. अद्यापपर्यंत राज्यपाल नियुक्त आमदारांच्या संदर्भात निकाल न लागल्याने आमदारांच्या यादीवर पाणी फिरले गेले. सर्वोच्च न्यायालयात या संदर्भात निकाल जाहीर करण्यात आला.

त्यात याचिकाकर्त्याने माघार घेताना न्यायालयाने स्थगिती उठवली. राज्य शासनाला राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर करण्यास निकालानंतर परवानगी मिळाली आहे. परंतु, राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

NCP and bjp party
Maharashtra Politics Update : मुश्रीफांसारख्या दिग्गजाविरोधात जिद्दीनं लढा; 'या' नेत्याला मिळणार निष्ठेचं फळ, लोकसभेसाठी तीन नावं चर्चेत

भाजप-शिवसेना (शिंदे गट), तसेच नुकताच सरकारमध्ये सहभागी झालेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे सरकार आहे. त्यामुळे भाजपसह अजित पवार गट व शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत सामावून घेणे गरजेचे राहील. त्या अनुषंगाने नाशिकमधून विविध नावांची चर्चा सुरू झाली आहे.

या नावांची चर्चा

पक्षाला शहर व जिल्ह्यात कानाकोपऱ्यात पोचविणारे प्रवक्ते लक्ष्मण सावजी, त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी करणारे महापालिकेचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांचे आध्यात्मिक क्षेत्रातील काम लक्षात घेऊन त्यांचेही नाव चर्चेत आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सहकार क्षेत्रातील व माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्यासह सहकार क्षेत्रातील विजय साने; तर मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या माजी सरचिटणीस नीलिमा पवार यांचे शिक्षणासह सहकार क्षेत्रातील काम लक्षात घेऊन त्यांच्याही नावाची चर्चा सुरू झाली आहे.

NCP and bjp party
Maharashtra Politics News : 'तू महाराष्ट्रभर फिरणे बंद कर, नाहीतर…'; भुजबळ, मुंडेंनंतर आता राणांना धमकी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.