BJP News: नाशिक लोकसभेसाठी भाजपची ‘खेळपट्टी’! राष्ट्रीय अध्यक्ष नड्डांच्या उपस्थितीत शुक्रवारी कार्यकारिणी सभा

jp nadda
jp naddaesakal
Updated on

BJP News : पुढील वर्षाच्या एप्रिल किंवा मे महिन्यात लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने त्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात जोरदार फिल्डिंग लावली जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून नाशिक लोकसभेची जागा शिवसेनेकडे असली तरी भारतीय जनता पक्ष देखील या मतदारसंघातून उमेदवार उभा करण्यासाठी ‘खेळपट्टी’ तयार करत आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची शुक्रवारी (ता. १६) पक्षाच्या कार्यकारिणीची होणारी जाहीर सभा हा त्याचाच एक भाग मानला जात आहे.

नड्डा यांच्या एक दिवसाच्या दौऱ्यात त्र्यंबकेश्वर दर्शन ते आरोग्य व क्रीडा क्षेत्रात नावाजलेल्या व्यक्तींच्या भेटीतून सामाजिक कानोसा देखील घेतला जाणार आहे. (BJP playground for Nashik Lok Sabha Executive meeting on Friday in presence of National President JP Nadda Nashk Political News)

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षशिवसेनेची युती होती, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्र चूल मांडत महाविकास आघाडी ची कास धरली. शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र गट स्थापन केला व निवडणूक आयोगाने देखील त्या गटाला मान्यता देत शिवसेनेचे चिन्ह शिंदे यांच्या गटाकडे सोपविले.

राज्याच्या राजकारणावर प्रभाव पाडणाऱ्या राजकीय घटनांचा परिणाम लोकसभा निवडणुकीवर निश्चितच होणार असल्याचे दिसून येत आहे. त्यादृष्टीने भारतीय जनता पक्षाने एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटाची युती होईल की नाही हे निवडणूक जवळ येईल तसे समोर येईलच. परंतु अगदी गाफीलपणाचा भाग नको म्हणून भारतीय जनता पक्षाने राज्यात ४५ लोकसभा व दोनशे विधानसभेच्या मतदारसंघांमध्ये निवडणुकीची तयारी केली आहे.

त्याच अनुषंगाने येत्या १६ जूनला ठक्कर डोम येथे भारतीय जनता पक्षाच्या नाशिक कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे संबोधित करणार असून त्यांच्या भाषणाने या कार्यकारिणीचा समारोप होईल.

अध्यक्ष नड्डा यांचा हा नियमित दौरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नऊ वर्षाच्या यशस्वी कामगिरीचा लेखाजोखा मांडण्यासाठी बैठक होत असल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात लोकसभेसाठी खेळपट्टी तयार करण्यासाठीच नड्डा हे नाशिकच्या मैदानात उतरून प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

jp nadda
BJP Politics: अब की बार तामीळ पंतप्रधान! अमित शाहांची गुगली, भाजप कार्यकर्ते संभ्रमात

तर दिनकर पाटील यांचा पर्याय

नाशिक लोकसभेसाठी भारतीय जनता पक्षाकडून देखील अनेकांनी तयारी सुरू केली आहे. पक्षाच्या आचार संहितेनुसार माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांच्या व्यतिरिक्त अन्य इच्छुकांनी उघड भूमिका घेतलेली नाही.

पक्ष संघटनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पाटील यांना शब्द दिल्याने लोकसभेसाठी त्यांनी उघडपणे तयारी सुरू केली आहे. नाशिक शहरातील साडेतीन विधानसभा मतदारसंघासह इगतपुरी-त्र्यंबकेश्वर, सिन्नर व नाशिक तालुका भागात गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून ते काम करत आहे.

या सहा विधानसभा मतदारसंघांमध्ये कार्यकर्ते, सामाजिक संघटनांचे जाळे त्यांनी निर्माण केले आहे. त्यामुळे शंभर टक्के ते निवडणूक लढणारच अशी परिस्थिती आहे. पाटील यांची तयारी लक्षात घेता भाजपकडून त्यांना उमेदवारी न मिळाल्यास महाविकास आघाडीकडून देखील त्यांना उमेदवारी देण्याची तयारी आहे.

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नाशिक लोकसभेची जागा लढवली जाईल. राष्ट्रवादीकडून सिन्नरचे आमदार माणिक कोकाटे तर मविप्र चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांचे नाव चर्चेत आहे.

कोकाटे हे मविप्र च्या निवडणुकीमध्ये पराभूत झाल्याने त्यांचा दावा कमजोर झाला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा नाशिक लोकसभेवर भक्कम दावा आहे. मात्र, त्यांच्याकडे दमदार असे नेतृत्व नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

jp nadda
BJP Election : निवडणूक पंचवार्षिक मात्र पाचही वर्षे ‘इलेक्शन मोड’!

जिल्हाप्रमुख विजय करंजकर हे लोकसभेसाठी दावेदार होऊ शकतात मात्र त्यांचे कार्यक्षेत्र भगूर व नाशिक तालुक्यापुरते मर्यादित असल्याने ते कुठपर्यंत लढत देऊ शकतील याबाबत उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना साशंकता आहे. त्यामुळेच पूर्ण तयारीनिशी लोकसभेच्या मैदानात उतरलेल्या पाटील यांच्यावर महाविकास आघाडी कडून जाळे फेकले जाऊ शकते.

नड्डा यांच्याकडून कानोसा

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्याकडून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी घेऊन लोकसभा निवडणुकीचा कानोसा देखील घेतला जाणार आहे. कोविड काळात रुग्णांची शास्त्रीय पद्धतीने सेवा करणाऱ्या डॉ. अतुल वडगावकर, क्रीडा क्षेत्रात नाशिकचे नाव पोचविणाऱ्या कविता राऊत यांची भेट ते घेणार आहेत.

त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी नड्डा जाणार आहेत. मागील महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वारावर धूप दाखविण्याच्या प्रकारावरून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर नड्डा यांच्या त्र्यंबकेश्वर भेटीला महत्त्व आहे.

jp nadda
Maharashtra Politics: शिंदे गटातील पाच मंत्र्यांवर टांगती तलवार; गच्छंतीसाठी भाजपचा दबाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.