Nashik BJP News: लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी; आहेर, सानप यांच्यावर दोन्ही संघाची जबाबदारी

 BJP
BJPesakal
Updated on

Nashik BJP News : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसले असून लोकसभेच्या 45 व विधानसभेच्या दोनशे जागा निवडून आणण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले आहे.

भाजपच्या या एकला चलो रे धोरणामुळे मागील वर्षाच्या जून महिन्यात फूट पडलेल्या शिवसेनेच्या शिंदे गटाला मात्र धक्का बसला आहे.

राज्यातील लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देताना नाशिकसाठी जिल्हा प्रमुख केदा आहेर यांच्याकडे तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.

त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देखील निश्चित करण्यात आली आहे. (BJP preparations for Lok Sabha and Assembly elections responsibility of both teams on keda Aher balasaheb Sanap nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 BJP
Maharashtra Politics : 'मच्छर मारण्यासाठी धमकी देण्याची गरज नाही'; भाजप नेत्याचं वक्तव्य

विधानसभा मतदार संघनिहाय जबाबदारी अशी

नाशिक पूर्व :सुनील केदार, नाशिक मध्य: अनिल भालेराव, नाशिक पश्चिम : राजेश दराडे, देवळाली : तनुजा घोलप, सिन्नर : जयंत आव्हाड, निफाड : भागवत बोरस्ते, येवला : अमृता पवार, दिंडोरी : संजय वाघ, इगतपुरी : सीमा झोले, नांदगाव :पंकज खताळ, मालेगाव मध्य : सुनील गायकवाड, मालेगाव बाह्य : देवा पाटील, कळवण : रमेश थोरात, चांदवड: भूषण कासलीवाल, बागलाण : पंकज ठाकरे.

 BJP
Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणातून मोठी अपडेट; विधीमंडळाचे केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.