BJP Press Conference : भाजप वसंतस्मृती कार्यालयाच्या जागेवरच नवीन कार्यालय उभे राहणार आहे.
वसंतस्मृती कार्यालयासाठी शेजारील इमारतीची जागादेखील खरेदी करण्यात आली असून, दोन्ही जागांचे एकत्रीकरण करून पक्ष कार्यालय उभारले जाणार असल्याची माहिती प्रदेश सरचिटणीस चौधरी यांनी दिली. (BJP Press Conference Vasant Smriti office to be expanded girish Palve remains as city precedent nashik news)
बूथरचना कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. चौधरी बोलत होते. ते म्हणाले, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बूथ सशक्तीकरण अभियान राबविले जात आहे.
अभियानांतर्गत जिल्हा, मंडल स्तरावर कार्यशाळा घेण्यात आल्या. शहरात बूथनिहाय २२५ विस्तारकांची नेमणूक करण्यात आली आहे. अभियानाच्या ३१ कलम कार्यक्रमानुसार बूथ स्तरावरील यंत्रणा मजबूत करणे, नवीन कार्यकर्त्यांची नेमणूक, बूथस्तरीय समिती प्रमुखांची नियुक्ती केली जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात दोनशेहून अधिक तर लोकसभेच्या ४५ हून अधिक जागांवर विजय मिळविण्याचे उद्दिष्ट आहे. मतदारांपर्यंत पोचण्यासाठी सरल अॅपवर नोंदणी करून घेतली जात आहे.
हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत
राज्यात नऊ कोटी मतदार आहेत. सहा कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावतात. ५१ टक्के मतदारांपर्यंत या अॅपच्या माध्यमातून पोचण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
या वेळी संघटन मंत्री रवी अनासपुरे, शहराध्यक्ष गिरीश पालवे, माजी महापौर सतीश कुलकर्णी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सरचिटणीस पवन भगूरकर, सुनील केदार, जगन पाटील, माजी महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते.
शहराध्यक्ष बदलाच्या तूर्त पडदा
शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्या नेतृत्वाखाली बूथ सशक्तीकरण अभियान सक्षमपणे राबविले जात आहे. त्यामुळे या अभियान काळात शहराध्यक्ष बदल होवू शकत नाही, असे स्पष्टीकरण प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी दिले. त्यामुळे शहराध्यक्ष बदलाची चर्चा तूर्त थांबली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.