NMC Commissioner Appointment : आयुक्त पदासाठी भाजप-शिंदे गटात रस्सीखेच!

Shinde Group BJP News
Shinde Group BJP Newsesakal
Updated on

NMC Commissioner Appointment : महापालिकेच्या आयुक्तपदी कायमस्वरूपी नियुक्ती होत नसल्याने राम भरोसे कारभार चाललेल्या महापालिकेच्या कामकाजावर परिणाम होताना दिसत आहे.

अकरा दिवस उलटूनही आयुक्त मिळत नसल्याने यामागे भाजप व शिवसेनेच्या शिंदे गटात सुरू असलेली रस्सीखेच कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. भाजप व शिंदे गटाकडून आयुक्तांच्या नावावर एकमत होत नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. (BJP Shinde group tug of war for post of NMC Commissioner Appointment Nashik Political News)

मागील वर्षी महापालिकेच्या आयुक्त पदावरून कैलास जाधव यांची उचलबांगडी करण्यात आली त्या पाठोपाठ मुंबई महापालिकेचे सह आयुक्त रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली. पवार हे जेमतेम तीन महिने या पदावर कार्यरत राहिले. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाचे डॉ.

चंद्रकांत पुलकुंडवार यांची आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. पुलकुंडवार यांना वर्ष होत नाही तोच साखर आयुक्तपदी त्यांची नियुक्ती केली. वास्तविक राज्यातील ठराविक महापालिकांमध्ये काम करण्यास अनेक आयएएस अधिकारी इच्छुक असतात.

आयुक्तपदी बसण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबिंग देखील केले जाते. मात्र नाशिक महापालिकेचे नियमित आयुक्तांची बदली होऊनही त्यांच्या जागेवर कायमस्वरूपी नियुक्ती केली जात नाही.

राज्यातील प्रमुख स्थानिक स्वराज्य संस्थांवर आपल्या मर्जीतील अधिकारी बसविण्याची स्पर्धा शिवसेनेचा शिंदे गट व भारतीय जनता पक्षात सुरू आहे. नाशिक सारख्या मोठ्या शहरावर आपल्या मर्जीतील अधिकारी बसण्यासाठी दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Shinde Group BJP News
Maharashtra Politics : ठिणगी पडणार? राज्यात CM शिंदे हे फडणवीसांपेक्षा जास्त फेमस! शिवसेनेच्या जाहिरातीने खळबळ

या अधिकाऱ्यांची नावे चर्चेत

फिल्मसिटीचे संचालक अविनाश ढाकणे, नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मनीषा खत्री, नंदुरबार जिल्हा परिषदेचे सीईओ रघुनाथ गावडे, राज्याचे ईएसआय आयुक्त अशोक करंजकर, सोलापूरचे सीईओ दिलीप स्वामी यांच्या नावांची चर्चा आहे.

खत्री यांच्या नावासाठी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचा आग्रह आहे. तर नाशिकच्या विद्यमान पालकमंत्र्यांकडून पवार नामक अधिकाऱ्याच्या नियुक्तीसाठी आग्रह धरला जात असल्याचे बोलले जात आहे.

भाजपचा हस्तक्षेप

भारतीय जनता पक्षशिवसेनेच्या शिंदे गटाला पालकमंत्री पदे विभागून दिली आहे ज्या पक्षाचा पालकमंत्री त्या जिल्ह्यात हस्तक्षेप करायचा नाही असे सूत्र ठरले आहे. परंतु नाशिकच्या बाबतीत हस्तक्षेप होत असल्याने शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

Shinde Group BJP News
Maharashtra Politics : 'त्या' वादग्रस्त मंत्र्यांची वागणूक शिंदेंना भोवणार; मंत्रीमंडळ विस्ताराआधीच भाजपकडून दबाव?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.