Nashik Political: भाजप, शिंदे की पवार गटाकडे नेतृत्व? बदलत्या राजकारणातून नाशिक लोकसभा मतदारसंघात पेच!

Bhujbal, Godse, Seema Hire, Dinkar Patil
Bhujbal, Godse, Seema Hire, Dinkar Patilesakal
Updated on

Nashik Political : २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात तयार झालेली महाविकास आघाडी, त्यानंतर शिवसेनेत फूट पडून शिंदे गटाने मांडलेली वेगळी चूल व आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवार यांनी निर्माण केलेला स्वतंत्र गट, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नाशिक लोकसभा मतदारसंघात आघाड्यांमधील बिघाड्यांचा पेच निर्माण होणार आहे.

महाविकास आघाडीचा एक गट व भाजप, पवार, शिंदे आघाडीच्या दुसऱ्या गटातून उमेदवारी निश्चित झाली तरी आघाड्यांमधील मित्र गट एकमेकांना कितपत मदत करतील, हादेखील संशोधनाचा भाग ठरणार आहे. (BJP Shinde or Pawar group leadership confusion in Nashik Lok Sabha Constituency due to changing politics Nashik)

भाजप शिवसेना युतीत नाशिक लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे, तर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत राष्ट्रवादीकडे आहे. २०१४ पासून शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत. त्यापूर्वी राष्ट्रवादीचे खासदार होते.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजप व शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून वाद निर्माण होऊन शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने महाविकास आघाडी तयार केली व सत्ता मिळविली.

२०२२ मध्ये शिवसेनेला खिंडार पडले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र गट स्थापन होऊन भाजपच्या मदतीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले.

त्यामुळे लोकसभा निवडणुकीत भाजप की शिवसेनेच्या शिंदे गटाचा उमेदवार उभा राहील, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यात आता अजित पवार गट हा नवा भिडू आल्याने आणखी पेच वाढला आहे.

Bhujbal, Godse, Seema Hire, Dinkar Patil
Ajit Pawar VS Sharad Pawar: अजितदादांची विरोधी भूमिका, शरद पवारांचं काय चुकलं?

भाजपची शतप्रतिशत तयारी

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर भाजपने नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची चाचपणी सुरू केली.

ॲड. राहुल ढिकले, डॉ. राहुल आहेर यांची नावे चर्चेत असताना महापालिकेचे माजी सभागृहनेते दिनकर पाटील यांना काही पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आश्वासनानुसार त्यांनी उघडपणे लोकसभेचा प्रचार सुरू केला, तर पश्चिमेच्या आमदार सीमा हिरे यांनीदेखील उमेदवारी मिळाल्यास लोकसभा लढविण्याची तयारी दर्शविली.

नाशिक लोकसभा काबीज करण्याची मानसिकता भाजप कार्यकर्त्यांची झाली असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीमुळे भाजप समोर पेच निर्माण झाला आहे.

शिंदे गटाकडूनही दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत गोडसे शिवसेनेच्या शिंदे गटात सुरवातीपासून आहे. विद्यमान खासदार म्हणून शिंदे गटाकडून नाशिक लोकसभेची मागणी होईल. मतदारसंघात तसा प्रचारदेखील सुरू आहे.

परंतु भाजपने यापूर्वीच ४८ पैकी लोकसभेच्या ४५ जागा लढविण्याची घोषणा केल्याने मित्रपक्षांना सोडल्या जाणाऱ्या तीन जागांमध्ये नाशिकच्या जागेचा समावेश आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही.

भाजपने शिंदे गटाला नाशिकची जागा न दिल्यास बंडखोरी होईल का, शिंदे गट भाजप विरोधात बंडखोरीची उघड भूमिका घेणार नाही. त्यामुळे नाशिकच्या जागेसाठी शिंदे गटाला लढावे लागणार, हे स्पष्ट होते.

भाजपची तयारी बघता शिंदे गटाच्या उमेदवाराला नाशिकमधून उभे केल्यास कितपत साथ मिळू शकते, याबद्दलही साशंकता आहे. किंवा भाजपने निवडणूक लढविल्यास भाजपला शिंदे गट किंवा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे कितपत साथ मिळेल हादेखील एक भाग आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bhujbal, Godse, Seema Hire, Dinkar Patil
Sharad Pawar : वय ८२ असो वा ९२ मला फरक पडत नाही; शरद पवारांनी स्पष्ट केले इरादे

खासदार गोडसे चालतील का?

हेमंत गोडसे विद्यमान खासदार असले तरी त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळेल का, सर्वेक्षणावर विश्वास ठेवणाऱ्या भाजपच्या सर्वेक्षण यादीत गोडसे प्रथम क्रमांकावर आहे का, ॲन्टी इन्कबन्सीचा विचार करता भाजपला शिंदे गटाकडून गोडसे यांची उमेदवारी मान्य असेल का, हादेखील एक प्रश्न आहे.

खासदार गोडसे हे भाजपच्या चिन्हावर उभे राहिले तरी मित्रपक्षांची कितपत साथ मिळेल, हा एक प्रश्न आहे.

२०१४ च्या निवडणुकीत गोडसे यांची प्रमुख लढत राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांच्यासमवेत होती. आता भुजबळ यांचे नाव भाजप मित्रपक्षांच्या यादीत आहे. त्यामुळे भुजबळ व त्यांची राष्ट्रवादी गोडसेंना कितपत मदत करेल, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपच्या नव्या मित्राचीही अडचण

महाविकास आघाडीतील बिघाडीमुळे भाजपचे मित्र बनलेल्या छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाचा अनुभव यापूर्वी घेतलेला आहे. प्रयत्नांती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे नाशिक लोकसभा मतदारसंघ आल्यास उमेदवार म्हणून छगन भुजबळ यांच्याकडेच जबाबदारी येईल.

अशावेळी २०१४ ची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. भुजबळांना विरोध असे नरेटिव्ह सेट असलेल्या शिंदे गटाकडून निवडणुकीत मदत होण्याची शक्यता धूसर आहे. परिवार वाद व भ्रष्टाचार या मुद्द्यावर भुजबळांना नाशिकच्या भाजप नेत्यांनी अनेकदा घडले आहे.

राज्यात अजित पवार गटाची ताकद वाढणे भाजपला परवडणारे नाही. अशा बारीकसारीक अनेक मुद्द्यांवर भाजपकडून कितपत मदत होईल, हादेखील एक भाग आहे. तूर्त छगन भुजबळ यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादीकडे दुसरा चेहरा नाही.

सिन्नरचे आमदार ॲड. माणिक कोकाटे यांचा विचार केला तरी मविप्र संस्थेच्या निवडणुकीतील पराभवामुळे त्यांना मराठा समाजाचा कितपत पाठिंबा मिळेल याबाबत शाश्वती नाही.

एकंदरीत भाजप व शिवसेनेचा शिंदे गट, राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित गट या तिघाही पक्ष गटांना नाशिक मतदारसंघ सोपा नसल्याचे दिसून येते.

Bhujbal, Godse, Seema Hire, Dinkar Patil
Ajit Pawar Mumbai NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष नेमला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.