Nashik Crime BJP News : शहरातील सिडको, अंबड भागात बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधकांकडून टीका होत असताना टीकेच्या सुरातसुर मिळवून भाजप प्रवक्ते प्रदीप पेशकार यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. पोलिस ठाण्यात नागरिकांना चुकीची वागणूक दिली जाते.
उलट फिर्यादीची उलट तपासणी घेतली जाते. चार महिन्यात चार पोलिस निरीक्षकांच्या बदल्या होत असेल तर परिस्थितीला जबाबदार असलेल्या घटकांवर तातडीने उपाय करण्याची मागणी भाजपच्या प्रवक्ते तसेच उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकर यांनी केली. (BJP spokesperson Pradeep Peshkar criticise police on increasing murder cases nashik news)
अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागील काही महिन्यात गंभीर गुन्हे घडत आहे. नुकत्याच चार खुनामुळे सिडको, अंबड भाग हादरून गेला आहे. रात्रीसह दिवसाढवळ्या खुलेआम गुन्हेगारी कृत्य घडत आहे. हाणामाऱ्या, चोऱ्या, वाहनांची तोडफोड या गोष्टी सततच्या झाल्या आहे.
वाढत्या गुन्हेगारीमुळे अंबड पोलिस ठाण्याचे विभाजन करून चुंचाळे येथे नवीन पोलिस ठाणे निर्माण करावे अशी मागणी देखील अनेकदा करण्यात आली. बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवरून पोलिस ठाण्यात ठिय्या देण्याचे प्रकार वाढले आहे. नागरिकांचा पोलिसांवरच विश्वास घटत असताना तो विश्वास वाढविण्यासाठी पोलिसांनी काही प्रमाणात कार्यवाही सुरु केली असली तरी त्या कारवाईमध्ये ठोसपणा नाही.
कायदा व सुव्यवस्था बिघडत असताना दुसरीकडे राजकीय चिखलफेक देखील सुरु झाली आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
भारतीय जनता पक्षाची ताकद असलेल्या विधानसभेच्या या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राज्य सरकारकडे बोट दाखविले जात असताना आत त्यात भर म्हणून कि काय श्री. पेशकार यांनी देखील पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला.
वास्तविक पोलिसांवर टीका करताना या विभागात आमदार भाजपचे आहे. राज्याचे गृहमंत्रिपद उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असून पोलिसांच्या कामात कमतरता दाखविताना राज्यातील सत्ताधारी भाजपकडे देखील आपसूक बोट जात असल्याने पेशकार यांनी पोलिसांबद्दल सामाजिक माध्यमांवरून केलेली टिप्पणी भाजपला घरचा आहेर मानली जात आहे.
"सिडको, अंबड परिसरात पंधरा दिवसात चार खून झाले. पोलिस ठाण्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना दुर्लक्षित वागणूक दिली जाते. अंबड पोलिस ठाण्यात फिर्यादीचींच उलट तपासणी घेतली जाते. अंबड पोलिस ठाण्यात चार महिन्यात चार पोलिस निरीक्षकांची बदली होती. पोलिसांच्या कामात कमतरता असल्याने त्यातून बदलीचे प्रकार घडत आहे." - प्रदीप पेशकार, प्रवक्ते, भाजप
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.