Nashik Politics : माजी नगरसेवकांच्या हातात BJP नारळ देणार...?

BJP news
BJP newsesakal
Updated on

नाशिक : सत्ते विरोधातील (ॲण्टी इन्कम्बसी) कल लक्षात घेऊन गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपने मंत्री बदलण्यापासून निवडणुकीत उमेदवारी देण्यापर्यंत केलेल्या बदलाचा परिणाम म्हणून विक्रमी यश मिळाल्याने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतदेखील अशाच प्रकारचा बदल केला जाणार आहे. त्यामुळे प्रस्थापितांसाठी मोठा धक्का राहणार असून पक्षाच्या प्रगतीपुस्तकात कमी गुण असलेल्या नगरसेवकांना डच्चू मिळणार आहे. असे जवळपास वीस नुकतेच माजी झालेल्या वीस ते बावीस नगरसेवकांच्या हातात नारळ टेकविण्याची तयारी पक्षाकडून झाली आहे. निवडणुकीच्या तिकीट वाटपातून कोणाला नारळ मिळाला स्पष्ट होणार असून, महापौर निवडणुकीत पक्षाला अडचणीत आणणाऱ्यांचा वरचा क्रमांक आहे. (BJP will thorw out former corporators or not Nashik Latest Political News)

गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल नुकताच लागला. या निवडणुकीत भाजपला गुजरातेत विक्रमी यश मिळाले. या यशामागच्या अनेक कारणांपैकी निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेले बदल व नव्या चेहऱ्यांना संधी हे महत्त्वाचे मानले जात आहे. यशाचा हाच फॉर्म्युला महाराष्ट्रातदेखील वापरला जाणार आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी पुढील वर्षात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे.

अठरा महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ॲण्टी इन्कम्बसी फॅक्टरचा परिणाम नको म्हणून बदल होणार असल्याचे निश्‍चित मानले जात आहे. सत्ते विरोधातील कल अर्थात ॲण्टी इन्कम्बसी फॅक्टरचा अभ्यास करून अनेक वर्षांपासून निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या कार्य अहवालाचा व जनतेच्या कौलांच्या सर्वेक्षणानुसार उमेदवारी निश्‍चित होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा : Credit Score :असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

BJP news
Nashik News : आदिवासी बांधवांच्या समस्या सुटणार; सूचनेनंतर यंत्रणा नागरीकांच्या दारात

माजी नगरसेवकांचे बॅड बुक

नाशिक महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या जवळपास वीस ते बावीस माजी नगरसेवकांना डच्चू देण्याची तयारी झाली आहे. ज्या नगरसेवकांचे प्रगतिपुस्तक चांगले आहे. त्यांना उमेदवारी मिळेल. चांगले काम केले असले तरी पक्षाची शिस्त मोडणाऱ्यांसाठीदेखील धोक्याची घंटा आहे. २०१९ च्या महापौर पदाच्या निवडणुकीत बंड केलेल्या बारा नगरसेवक बॅड बुकमध्ये गेले आहे.

शिंदे गटाच्या संपर्कात

शिंदे गटाच्या निमित्ताने राजकारणाच्या खेळपट्टीवर नवा संघ उदयाला आल्याने भाजपकडून उमेदवारी मिळेल की नाही, याबाबत साशंकता असलेले काही नगरसेवक शिंदे गटाच्या नेत्यांच्या संपर्कात आले आहेत. महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे गट युती होईल, असा अंदाज बांधून संपर्काचा सेतू बांधला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

BJP news
Market Committee Election : 14 बाजार समित्यांसाठी 30 हजार 498 मतदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.