नवीन विद्यापीठ विधेयक मागे घ्यावे यासाठी युवा मोर्चा युवती विभागाचा निषेध

नाशिक महानगराने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर रांगोळी काढून निषेध व्यक्त केला नाशिक महानगराने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानाबाहेर रांगोळी काढून निषेध व्यक्त केला !
भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग
भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभागsakal
Updated on

सिडको : विद्यार्थ्यांच्या आयुष्याची राखरांगोळी करणारे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक (काळे विधेयक) महविकास आघाडी सरकारने मुद्दाम घाई घाईने पारित करून घेतले.या माध्यमातून प्र.कुलपती हे नवीन पद तयार करून सन्मा कुलपतींचे अधिकार उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांना दिले जाणार आहेत.विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा (Universities turned into hotbed of politics)बनविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे.

भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग
सातारा : शिक्षकाने बनवली इलेक्ट्रॉनिक सायकल

भविष्यात कुलगुरूंच्या नियुक्त्या ,विद्यार्थ्यांच्या पदव्या या सगळ्यातच आरोग्य सेवक भरती परीक्षा ,म्हाडा परीक्षा प्रमाणे करोडोंच्या भ्रष्टाचाराचे विषय करण्यासाठी यांना हे प्र.कुलपती पद पाहिजे का? हा प्रश्न विद्यार्थी विचारत आहे.या काळया विधेयकाला विरोध करण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा ने मुख्यमंत्र्यांना १० लाख पत्र पाठवले. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांना मिस कॅाल्स, मेसेज, ई-मेल पाठवून निषेध व्यक्त केला.(Nashik News)

भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग
सोलापूरच्या फटेचा ५०० कोटींचा 'विशाल' स्कॅम? ४१ लाखांच्या कारची रोखीने खरेदी

राज्य सरकारने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घ्यावी या साठी आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणुन आज भारतीय जनता युवा मोर्चा युवती विभाग नाशिक महानगराच्या वतीने नाशिकचे पालकमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या भुजबळ फार्म निवासस्थानाबाहेर पहाटे ६.०० वाजता निषेधाची रांगोळी काढण्यात आली. यावेळी भाजयुमो शहर सरचिटणीस ऋषिकेश आहेर, शहर युवती प्रमुख साक्षी दिंडोरकर, स्वाती माळोदे, मयुरी शुक्ल, लीना मोरे आदी उपस्थित होते.

-प्रमोद दंडगव्हाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.