नाशिक : माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी, उज्ज्वलम ऍग्रोच्या माध्यमातून कोट्यवधीं च्या घोटाळ्यात सोमवारी (ता. 17) अटक करण्यात आलेले भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस व नाशिक रोड-देवळाली व्यापारी बॅंकेचे संचालक सुनील खंडेराव आडके यांना जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवार (ता. 24) पर्यंत म्हणजेच, सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या चौकशीतून आडके यांच्याकडून घोटाळ्या चा मुख्य सूत्रधार विष्णू भागवत यांच्या कोट्यवधींच्या मालमत्तेच्या धक्कादायक व्यवहारांची माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, आठ एजंटांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ झाली आहे.
बहुतांश मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्याने
माउली मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी, संकल्पसिद्धी प्रॉडक्ट इंडिया, उज्ज्वलम ऍग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या फसवणूकप्रकरणी गेल्या 7 फेब्रुवारीला नाशिक शहर आर्थिक गुन्हे शाखेने मुख्य संशयित विष्णू भागवत आणि आठ एजंटांना अटक केली होती. विष्णू भागवतची अन्य जिल्ह्यांतही मालमत्ता असल्याचे समोर आले होते; परंतु यातील बहुतांश मालमत्तेची कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आल्यानंतर, संबंधित दस्तऐवजात समावेश असल्याप्रकरणी सोमवारी पोलिसांनी भाजपचे शहर सरचिटणीस सुनील आडके यांना अटक केली. आडके यांना मंगळवारी (ता. 18) जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले असता, त्यांना सोमवारपर्यंत (ता. 24) पोलिस कोठडी सुनावली आहे.
राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ
आडके यांच्या अटकेमुळे राजकीय आणि व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मुख्य संशयित विष्णू भागवत यांच्या पालघर येथील कोट्यवधी रुपयांच्या जमिनीची कागद पत्रे हाती लागली होती. तपासात मात्र ही जमीनच नसल्याचे निष्पन्न झाल्या नंतर, या प्रकरणी दस्तऐवजांची छाननी केल्यानंतर याकामी आडके यांनी भागवतांना मदत केल्याचे व प्रत्यक्ष सहभाग असल्याचे समोर आले. त्यामुळे भागवतांच्या दडून असले ल्या कोट्यवधींच्या मालमत्तेची धक्कादायक माहिती आडके यांच्याकडून पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त होते आहे.
एजंटांच्या कोठडीत वाढ
माउली मल्टिस्टेट, संकल्पसिद्धी कंपन्यांची एजंटगिरी करीत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या आठ एजंटांच्या पोलिस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. कृष्णा भुंजगराव वारे (वय 39, रा. कृष्णप्रभा बंगला, आनंदनगर, पाथर्डी, जि. नगर), मयूर सुनील पवार (27, रा. पवार वस्ती, लचके प्लोअर मिलजवळ, बाजी रावनगर, येवला), प्रकाश आप्पासाहेब ननावरे (37, रा. बोरस्ते वस्ती, माळशिरस, जि. सोलापूर), धनंजय भीमराव सावंत (40, रा. मांडवे, ता. माळशिरस), दादा महादेव माने (26, रा. मुक्ती संकुल अपार्टमेंट, तांबेनगर, बारामती), नानासाहेब अशोक पायधन (35, रा. लक्ष्मीनिवास बंगला, तुकारामनगर, तळवाडे, ता. हवेली, जि. पुणे), रोहिदास शांताराम हजारे (48, रा. लक्षदीप सोसायटी, इंद्रायणीनगर भोसरी, पुणे) अशी संशयित एजंटांची नावे आहेत.
पथके रवाना
कोट्यवधी रुपयांच्या या घोटाळ्याप्रकरणी संशयित विष्णू भागवत यांच्या जवळच्या नातलगांचाही समावेश असल्याने त्यांच्या मागावर आर्थिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आलेली आहेत, तर काही पथके संशयितांच्या मालमत्तेची माहिती घेण्या साठी रवाना करण्यात आलेली आहेत. विष्णू भागवत यांच्याविरोधात परराज्यातही गुन्हे दाखल झाल्याने त्याचा ताबा घेण्याची जिल्हा न्यायालयाकडे मागणी होते आहे. विष्णू भागवत यांच्या कोठडीची मुदत गुरुवार (ता. 20)पर्यंत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.