Maratha Reservation : डॉ. भारती पवारांच्या कार्यक्रमात मराठा आरक्षणप्रश्नी घोषणाबाजी; तरूणांना काढले बाहेर

Union Minister of State Dr. Police arresting those raising slogans for Maratha reservation at Bharti Pawar's event.
Union Minister of State Dr. Police arresting those raising slogans for Maratha reservation at Bharti Pawar's event.esakal
Updated on

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी केंद्रीय पातळीवर काय करण्यात आले याचा खुलासा करण्याची मागणी करीत येथील मराठा समाजातील तरुणांनी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या अमृत कलश यात्रेत जोरदार घोषणाबाजी करीत त्यांच्या भाषणावेळी काळे झेंडे दाखविले. (Black flags were shown on Maratha reservation issue in Bharati Pawar program nashik news)

‘ताई तुमच्याशी बोलायचे आहे असे म्हणत एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणा देत विशाल वडघुले, भीमराज लोखंडे, योगेश वाघ निंबा बोरसे आदींनी डॉ. पवार बोलायला उभ्या राहताच त्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. केंद्र सरकार मराठा बांधवांना आरक्षण देण्यासाठी काय प्रयत्न करत आहे, असे विचारत घोषणा देताच पोलिसांची धावपळ उडाली.

त्यांनी घोषणाबाजी करणाऱ्या या तरुणांना बाहेर काढले, मात्र या सगळ्या प्रकारानंतरही डॉ. पवार यांनी आपले भाषण सुरूच ठेवत देशात अमृतकलश यात्रा सुरू असून विरांना नमन करण्यासाठीच्या कार्यक्रमात अशा प्रकार अडथळा आणणे म्हणजे विरोधकांना राजकारण करायचे आहे. देशासाठी शाहिद झालेल्या वीरांच्या कुटूंबियांना वंदन करण्याच्या कार्यक्रमाला देखील त्यांचा विरोध कसा आहे हे दिसून आले असा आरोप केला.

Union Minister of State Dr. Police arresting those raising slogans for Maratha reservation at Bharti Pawar's event.
Maratha Reservation : शेवगाव तालुक्यात पुढाऱ्यांना ‘नो एन्ट्री’; वेशीवर फलक, आरक्षण मिळेपर्यंत गावबंदी

शहिदांच्या स्मरणार्थ होणाऱ्या या कार्यक्रमात असा गोंधळ घालणं चुकीचं असल्याचं त्या म्हणाल्या. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतले. दरम्यान येथील सकल धनगर समाजातर्फेही कार्यक्रम संपल्यावर बिरु शिंदे भाऊसाहेब व्हडगर, त्र्यंबक शेरमाळे, खुशाल सोर, डॉ. गणेश चव्हाण, देविदास मार्कंड, सुनील सोर, सुनील मेंगनर, शरद आयनोर, संदीप पारेकर, प्रशांत मार्कंड, बापू पारेकर, हिमांत शिंदे, योगेश मार्कंड, हेमंत शेळके, अभिजित शेवाळे यांनी डॉ. पवार यांना निवेदन दिले.

‘मेरी माती मेरा देश मेरा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. लेझिम पथक, भजनी मंडळ यांच्या गजरात चिमुकल्यांनी लक्ष वेधले. नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करण्यासाठी नक्कीच पूर्ण पणे प्रयत्न करेल असे डॉ. पवार यांनी सांगितले.

Union Minister of State Dr. Police arresting those raising slogans for Maratha reservation at Bharti Pawar's event.
Maratha Reservation : 'जो कोणी मराठा आरक्षणाला विरोध करेल, त्‍याला आता सुटी नाही'; जरांगे-पाटलांचा स्पष्ट इशारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.