अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी

सिडकोतील अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी
सिडकोतील अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी esakal
Updated on

सिडको (नाशिक) : सिडको परिसरात अवैध गॅस विक्री आणि भरणा केंद्र, तसेच गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्याविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने अंबड पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुल कमानकर, मुकेश शेवाळे आदींनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याकडे ही मागणी केली. अत्यंत ज्वलंतशील आणि धोकादायक असलेल्या एलपीजी गॅसचा सार्वजनिक ठिकाणी खुलेआम काळा बाजार आणि भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांचा जीव धोक्यात टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सिडकोतील अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी
महागाई! मोदी सरकारचा सामान्यांना दणका, घरगुती गॅसच्या दरात वाढ

सिडकोतील खंडेराव चौक, पंडितनगरमधील मच्छी मार्केट, अंबडगाव बसस्थानकाच्या बाजूला, संजीवनगर आदी ठिकाणी सर्रासपणे गॅस रिफिलिंग मोटारींसाठी करण्यात येते. महागाईच्या या परिस्थितीत गोरगरिबांना गॅस सिलिंडर उपलब्ध होत नसताना, अशा काळ्या बाजारामुळे गॅस सिलिंडरची अजून टंचाई निर्माण होत आहे. भरचौकात रहिवाशांचा वावर असणाऱ्या परिसरात हा अवैध व्यवसाय केला जातो. यामुळे विस्फोट झाला, तर मोठी दुर्घटना घडून मोठी जीवितहानी होऊ शकते. तरी या पद्धतीने चालणारे सर्व व्यवसाय व व्यवसाय चालविणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या वेळी कृष्णा काळे, संतोष भुजबळ, हर्शल चव्हाण, विकी डहाळे आदी उपस्थित होते.

सिडकोतील अवैध गॅस भरणा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी
सिलिंडर दरवाढीची सर्वसामान्यांना झळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()