नाशिक : कोरोना महामारीच्या काळात एकीकडे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना हालअपेष्टांना सामोरे जावे लागत आहे. दुसरीकडे काही अपप्रवृत्ती मिळेल त्या संधीचे सोने करत आहे. अचानक वाढलेली मागणी आणि काळा बाजार होत असल्याने म्युकरमायकोसिसकरिता (myocardial infarction) लागणारे ‘लापोजोमल एमपोटेरसिन बी’ इंजेक्शनची चढ्या भावात विक्री होत आहे. मोठ्या संख्येने इंजेक्शनची आवश्यकता असल्याने नातेवाइकांना लाखो रुपये मोजावे लागत आहेत. (Black market of injections required for myocardial infarction In Nashik)
कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत आरोग्य व्यवस्था अक्षरशः कोलमडलेली असताना या परिस्थितीचा अपप्रवृत्तींनी आत्तापर्यंत पुरेपूर फायदा घेतला आहे. यापूर्वी रेमडेसिव्हिर, टोसिलीझुमॅब इंजेक्शनपासून तर ऑक्सिजनचा काळा बाजार होत असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले होते. कोरोनापश्चात आजारांमध्ये म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजाराने डोके वर काढले असल्याने रुग्ण संख्येत अचानकपणे वाढ झाली आहे. या रुग्णांच्या उपचार प्रक्रियेत ‘लापोजोमल एमपोटेरसिन बी’ या इंजेक्शनची आवश्यकता असते. या इंजेक्शनचाही काळा बाजार सध्या सुरू झाला असून, यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांना जादाचे पैसे मोजावे लागत आहेत.
मोजावे लागताय चौपट पैसे
‘लापोजोमल एमपोटेरसिन बी’ इंजेक्शनचे उत्पादन सिपला, मायलन, जीएसकेसह अन्य एक-दोन कंपन्या करतात. अचानक रुग्ण संख्यावाढीमुळे मागणी व पुरवठ्याचे सूत्र बिघडले आहे. एरवी अडीच ते तीन हजार रुपये प्रतिव्हायल विक्री होते. रुग्णाला दिवसाला त्याच्या वैद्यकीय स्थितीनुसार पाच-सहा व्हायल रोज असे २० दिवस इंजेक्शनं घ्यावी लागतात. सामान्य परिस्थितीत दहा ते पंधरा हजार रुपयांचा खर्च चौपट वाढला आहे. सध्या एक व्हायलची विक्री आठ हजार रुपयांपर्यंत होत आहे.
म्युकरमायकोसिसच्या रुग्णांमध्ये अचानक झालेल्या वाढीमुळे ‘लापोजोमल एमपोटेरसिन बी’ इंजेक्शनची मागणी वाढली आहे. यासंदर्भात उत्पादक कंपन्यांशी संपर्क साधला असून, उत्पादन वाढविले असल्याचे त्यांच्यामार्फत कळविले आहे. मधुमेह असलेल्या कोरोनामुक्त रुग्णांनी वेळीच तपासणी करत संभाव्य धोका टाळणेच योग्य ठरेल.
- डॉ. नितीन चिताळकर, कान- नाक- घसातज्ज्ञ, नाशिक
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.