Crime Update : मुले पळविणारे समजून ब्लँकेट विक्रेत्यांना बेदम मारहाण

beating latest crime news
beating latest crime newsesakal
Updated on

नाशिक : काही दिवसांपासून सोशल मीडियावर मुलांना पळवून नेणारी टोळी शहरात आली असल्याचा संदेश व्हायरल होतो आहे. याच व्हायरल संदेशावर विश्‍वास ठेवून उपनगर परिसरातील टाकळी भागात ब्लँकेट विक्री करणाऱ्या दोघा फेरीवाल्यांना मुले पळविणाऱ्यांची टोळी समजून नागरिकांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १३) दुपारी घडली.

सुदैवाने पोलिसांनी वेळीच दाखल होत हस्तक्षेप केल्याने दोघांची जमावाच्या तावडीतून सुटका झाली. यामुळे मोठी दुर्घटना टळली. (Blanket sellers brutally beaten as accused child kidnappers Nashik Latest Crime News)

काही दिवसांपासून सोशल मीडियावर लहान मुले पळवून नेऊन त्यांच्या अवयवांची विक्री वा त्यांचा भीक मागण्यासाठी वापर केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तर, काही वर्षांपूर्वी व्हॉटस् अॅपवरील व्हायरल संदेशामुळे मुले पळवणाऱ्यांची टोळी समजून धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे पाच निष्पाप नागरिकांची ग्रामस्थांनी ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती.

दरम्यान, याच घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिली. उपनगराच्या टाकळी रोड येथे ब्लँकेट विकण्यासाठी आलेल्या व्यक्तींना लहान मूल पळविणारे असल्याचा संशयावरून परिसरातील नागरिकांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर काही सुजाण नागरिकांनी याबाबत पोलिसांना कळविले. उपनगर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोघा विक्रेत्यांना ताब्यात घेत सखोल चौकशी केली.

तेव्हा ते खरेखुरे फेरीवाले असल्याचे व नेहमीच ब्लँकेट विकण्यासाठी येत असल्याचे समोर आले. टाकळी परिसरात ब्लँकेट विकताना परिसरातील शंकर मोगल साळवे यांचा लहान मुलाने विक्रेत्याचे ब्लँकेट ओढल्याने विकणाऱ्याने त्याला हटकून रागवत त्याला धरले होते.

beating latest crime news
Nandurbar : मुलीच्या मृत्यूनंतर न्यायासाठी झगडतोय बाप!

ही घटना परिसरातील नागरिकांनी बघितली व त्यांनी दोघा विक्रेत्यांना मारहाण केली. त्यात दोघे जखमी झाले आहेत. त्यांच्याकडील सर्व कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. दोघे संशयित मुले पकडणारे नसल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी पोलिस चौकशी सुरू आहे.

सत्यता पडतळावी

सोशल मीडियावर व्हायरल होणारे सजगतेचे प्रत्येक संदेश हे सत्य असतीलच असे नाही. तर, त्यासंदर्भात त्या संदेशाची सत्यता पडतळावी अन्यथा यातून गंभीर स्वरूपाचा प्रकार घडू शकण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच संशयावरून विनाकारण कोणालाही मारहाण करणे गैर असून, मारहाण करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी काही जागरूक नागरिकांनी केली आहे.

beating latest crime news
Nashik : वाट चुकलेल्या महिलेची पोलिसांकडून मूळ गावी रवानगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.