Nashik: मोदींच्‍या खासदारकीसाठी संत-महंतांचे आशीर्वाद! लोकभावनेला दर्शविली संमती; धार्मिक पर्यटनाला बळ मिळण्याचा विश्‍वास

मोदींच्‍या खासदारकीसाठी संत-महंतांनी आशीर्वाद दिले आहेत.
Prime Minister narendra modi
Prime Minister narendra modi esakal
Updated on

नाशिक : गत दहा वर्षांत वाराणसी अर्थात काशीचे चित्र जागतिक पातळीवर आमूलाग्र पद्धतीने बदलल्यानंतर पुढील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून खासदारकी करावी, अशी लोकभावना निर्माण झाली आहे.

त्‍यातच आध्यात्मिक क्षेत्रातूनही या लोकभावनेला संमती दर्शविताना, धार्मिक पर्यटनाला बळ मिळण्याचा विश्‍वास व्‍यक्‍त केले जात आहेत. मोदींच्‍या खासदारकीसाठी संत-महंतांनी आशीर्वाद दिले आहेत. (Blessings of saints and mahants for Modis MP consent shown to public sentiment Faith to boost religious tourism Nashik political)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘दक्षिण काशी’ नाशिकला कर्मभूमी केल्‍यास शहराची आध्यात्मिक उंची अधिकच वाढेल. आगामी कुंभमेळा त्‍यांच्‍या नेतृत्वाखाली ‘ना भूतो ना भविष्यती’ अशा स्वरूपाचा होईल, असा विश्‍वास अध्यात्‍म क्षेत्रातून व्‍यक्‍त करण्यात आला आहे.

त्‍यांच्‍या उमेदवारीचे सर्वच स्तरांवरून स्‍वागत होईल. विशेषतः आगामी कुंभमेळा अधिक भव्‍य स्वरूपात व्‍हायचा असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधूनच उमेदवारी करायला हवी, अशी भावना यानिमित्त व्‍यक्‍त करण्यात आली आहे.

मोदी घडवतील नाशिकची क्रांती

"संपूर्ण त्यागानिशी देशाला वाहून घेतलेले नरेंद्र मोदी हे दैवीशक्ती संपन्न युगपुरुष आहेत. स्वामी विवेकानंदप्रणीत राष्ट्रीय आदर्श, त्याग व सेवा यांचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. नाशिकसाठी त्‍यांची खासदारकी कल्याणकारी ठरेल. त्‍यांच्‍या उमेदवारीने सर्व क्षेत्रात क्रांती घडेल, रोजगार वाढेल. नाशिकची धार्मिक, सांस्कृतिक व औद्योगिक क्रांती घडेल. नाशिकला स्थिर, सुदृढ व कणखर व्यक्तिमत्त्वाची गरज आहे. सर्वांचे कल्याण करणारा लोकप्रतिनिधी सर्वांना हवाहवासा वाटतो. माझे या निःस्वार्थी भारतपुत्रासाठी संपूर्ण समर्पण असेल."- स्वामी श्रीकंठानंद, प्रवर्तक, जागृत नाशिक जागृत भारत अभियान

मंत्रभूमीसह यंत्रभूमीचा विकास होईल

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून निवडणूक लढवावी, अशी धर्माचार्य सभा, मंदिर महासंघ, विविध आखाडे अशा सर्वांचीच इच्छा आहे. वाराणसीचा चौफेर विकास झालेला आहे, तसाच विकास नाशिकचादेखील होईल. आज परिसरातील चारही झोनमधील उद्योग बंद पडले आहेत. याशिवाय शेतीचेही प्रश्‍न गंभीर बनले आहेत. याठिकाणी करन्सी नोटप्रेससह अनेक महत्त्वाचे उद्योग आहेत. मोदींच्या रूपाने नाशिकला सक्षम नेतृत्व लाभेल. बनारसचा जसा धर्मक्षेत्र म्हणून विकास झाला, तसा नाशिकचादेखील होईल. याशिवाय कांदा व अन्य फळबागांचेही प्रश्‍न सुटू शकतील. मोदींनी नाशिकमधून निवडणूक लढविल्यास खऱ्या अर्थाने सक्षम नेतृत्व लाभेल."- महामंडालेश्वर सुधीरदास पुजारी, महंत, निर्वाणी आखाडा

Prime Minister narendra modi
PM Modi Nashik Visit: पंतप्रधानांचा रोड-शो एक किमी अंतरासाठी; बंदोबस्तासाठी परजिल्ह्याचे पोलिस येणार

पंतप्रधान मोदींचे सदैव स्वागत

"पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक लोकसभा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चेने मन प्रफुल्लित झाले. पंतप्रधान मोदींनी खरोखर नाशिकमधून निवडणूक लढविल्यास या शहराचा सर्वच बाजूंनी विकास होईल. येथील उद्योगधंद्यांप्रमाणेच वाराणसीसारखी धार्मिक नगरी म्हणूनही विकास होण्यास मदत होईल. धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्‍थानिक अर्थव्‍यवस्‍था मजबूत होण्यास मदत होईल. त्‍यांच्‍या उमेदवारीचे सर्व स्तरांवरून स्‍वागतच होईल, असा विश्‍वास वाटतो."

- महामंडालेश्‍वर स्‍वामी संविदानंद सरस्वती, कैलास मठ, पंचवटी

मोदींची उमेदवारी, नाशिकचा सन्मान

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत वाराणसी मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. देशविदेशात सन्मानाचे स्थान मिळविलेल्या मोदींच्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीने नाशिकला एकप्रकारे सन्मान प्राप्त होऊ शकतो. मोदींच्या उमेदवारीने येथील सर्वच क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. याशिवाय येथील धार्मिक, सामाजिक, राजकीय प्रश्‍नही आपोआप मार्गी लागतील. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविल्यास तो खऱ्या अर्थाने नरेंद्र मोदी यांचा नव्हे, तर नाशिक शहराचा सन्मान ठरेल."

- महंत भक्तिचरणदास, अध्यक्ष, पंचमुखी हनुमान देवस्थान

सच्चा रामभक्त व राष्ट्रधर्म रक्षक

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढविणे, हे नाशिकचे सौभाग्य राहील. सच्चा रामभक्त व राष्ट्रधर्म रक्षक निवडणूक लढविणार असल्‍याचा सर्व साधू, संत, महंतांना आनंद होईल. त्‍यांच्या नेतृत्वाने नाशिकच नव्हे तर महाराष्ट्रासाठी सुवर्णकाळ असेल. रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण होईल. मंत्रभूमी ते यंत्रभूमी "ज्ञानमयोऽविज्ञानमयोसि" सुखावेल, तीर्थ क्षेत्राचा विकास होईल. येणारा कुंभ मेळा, गोदामहाआरती, संस्कृत विश्वविद्यालय, साध्वीभवन आदी सर्व विषय यशस्वीरीत्या पूर्ण होईल."- महंत डॉ. अनिकेतशास्त्री महाराज, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज महाराष्ट्र प्रदेशप्रमुख

नाशिकच्या चौफेर विकासाची नांदी

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक लोकसभेतून निवडणूक लढविल्‍यास नाशिकचा चौफेर विकास होईल. दक्षिण काशी, अशी नाशिकची प्राचीन ओळख आहे. योग्य नियोजन आणि कार्यकर्तृत्व दोन्ही गोष्टी मोदींमध्ये असल्‍यामुळे त्‍यांच्या नेतृत्वात नाशिकचा भाग्योदय नक्कीच होईल. मंत्रभूमीप्रमाणेच उद्योग वाढतील. त्यामुळे तरुणांना रोजगारनिर्मिती होईल. नाशिक कॉरिडॉर झाल्‍यास नाशिकच्‍या विकासाला चालना मिळून जागतिक पातळीवरील प्रमुख शहरांमध्ये नाशिकचे नाव समाविष्ट होईल."- डॉ. नरेंद्र धारणे, ज्‍योतिषशास्‍त्राचे अभ्यासक

नाशिकची जतना बहुमताने निवडेल

"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमधून आगामी लोकसभा निवडणूक लढवावी की नाही, हा संपूर्णपणे राजकीय विषय आहे. त्यामुळे याबाबत मत व्यक्त करणे संयुक्तिक नाही. परंतु जनभावनेचा विचार केल्‍यास पंतप्रधान मोदी यांनी हा मतदारसंघ निवडल्यास नाशिकची जनता त्यांची बहुमताने निवड करेल, यात शंकाच नाही. त्‍यांच्‍या प्रतिनिधीत्त्वामुळे नाशिकचा विकास होण्यास मदत होईल. धार्मिक पर्यटन वाढीस लागण्यास मदत होईल. कुंभनगरीमध्ये त्‍यांचे जल्‍लोषात स्‍वागतच होईल."- पंडित दिनेशशास्त्री गायधनी, नाशिक

Prime Minister narendra modi
Nashik ZP News: जिल्हा परिषद खरेदी करणार 6 नवीन इलेक्ट्रिक वाहने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.