YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना

YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना
Updated on

YCMOU News : भारतात मोजक्याच विद्यापीठात राबविली जाणारी ‘ब्लॉक चेन’ तंत्रज्ञान आधारित पदवी गुणपत्रिका पॅटर्नचा यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने अवलंब केला आहे. महाराष्ट्र हे शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे.

महाराष्ट्रात ‘ब्लॉक चेन’ आधारित गुणपत्रिका देणारे मुक्त विद्यापीठ पहिलेच असणार असून, या पॅटर्नचा राज्यभरातील विद्यापीठांनी अवलंब करण्याच्या सूचना राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी दिल्या. (Blockchain based ycmou Marksheet patterns will reach all over state nashik news)

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात गुरुवारी (ता. १२) आढावा बैठक झाली. बैठकीस आमदार तथा व्यवस्थापन मंडळाच्या सदस्या सरोज अहिरे, राज्यपालांच्या सचिव श्वेता सिंघल, उपसचिव रवींद्र धुर्जड, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, कुलसचिव भटूप्रसाद पाटील, व्यवस्थापक मंडळ सदस्य डॉ. जयदीप निकम, अनिल कुलकर्णी, विद्यापीठाचे वित्त अधिकारी डॉ. गोविंद कतलाकुटे, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन केंद्राचे संचालक डॉ. राम ठाकर उपस्थित होते.

प्रारंभी राज्यपाल तथा कुलपती बैस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास अभिवादन करून वृक्षारोपण केले. बैस यांनी परिसर पाहणीप्रसंगी परिसरात लावलेले केशर आंबा, द्राक्षांची रोपे राजभवनावर पाठवावीत, असेही सांगितले. आढाव्याप्रसंगी कुलगुरू प्रा. सोनवणे म्हणाले, की येत्या दीक्षान्त सोहळ्यात ‘ब्लॉक चेन’ आधारित पदवी गुणपत्रिका विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ‘ब्लॉक चेन’ आधारित गुणपत्रिकेमुळे विद्यार्थ्यांना हार्ड कॉपीची गरज भासणार नाही.

गुणपत्रिकेवरील क्यूआर कोडमुळे पदवीची सुरक्षितता, वैधता तपासली जाणार असल्याने खोट्या पदवी प्रमाणपत्राला आळा बसणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलगुरू प्रा. सोनवणे यांनी सादरीकरणाद्वारे विद्यापीठाच्या कार्याची माहिती दिली. राज्यपाल बैस यांनी रेडक्रॉस सोसायटी नाशिकच्या कार्याची माहिती सदस्य डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्यासह इतर सदस्यांकडून जाणून घेतली. बैस यांनी कृषी विज्ञान केंद्रास भेट दिली.

YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना
Tribal Ulgulan Protest : आरक्षणाला धक्का लावून तर पाहा! सत्तेतून बाहेर फेकण्याचा ‘उलगुलान’ मोर्चाप्रसंगी सरकारला इशारा

केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ज्ञ डॉ. नितीन ठोके यांनी कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांसाठी नवीन तंत्रज्ञान प्रसार, प्रक्षेत्र व्यवस्थापक संदीप भागवत यांनी शाश्वत आंबा कलम रोपे पुरवठा, कार्यक्रम सहाय्यक मंगेश व्यवहारे यांनी रासायनिक घटकांना पर्यायी म्हणून जैविक घटकांचा पीक उत्पादन वाढीसाठी वापर व पशुसंवर्धन शास्त्रज्ञ डॉ. श्याम पाटील यांनी ब्लॅक एस्ट्रो लॉर्प सुधारित कुकुटपालन जातीचे आदिवासी शेतकऱ्यांसाठी महत्त्व यासंदर्भात माहिती दिली. कृषी विज्ञाने केंद्राचे शास्त्रज्ज्ञ राजाराम पाटील, हेमराज राजपूत, प्रकाश कदम उपस्थित होते.

मराठीतून अभ्यासक्रम आणण्याच्या विद्यापीठांना सूचना

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने ४८ विविध कौशल्य कार्यक्रम सुरू केले असून, ही आनंदाची बाब आहे. विद्यापीठाने गेल्या वर्षी ६१ हजार तरुणांना कुशल केले. गृहिणी, दुकानदार, शाळा सोडलेल्या आणि तुरुंगातील लोकांमध्येही उच्चशिक्षण घेण्याची इच्छा आणि क्षमता असते. इतर समुदायांच्या तुलनेत आदिवासींमध्ये उच्चशिक्षणाची नोंदणी खूपच कमी आहे. येथेही विद्यापीठाने उपयुक्त भूमिका बजावावी.

यासाठी विद्यापीठाने त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न करावेत, विद्यापीठ २० दिवसांत विद्यार्थ्यांना अचूक निकाल देते. त्याची इतर विद्यापीठांनी अंमलबजावणी करावी, असेही बैस यांनी सांगितले. भाषेच्या अडचणीमुळे शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी सर्व अभ्यासक्रम मराठी भाषेतून आणावा, अशा सूचना सर्व विद्यापीठांना करण्यात आल्या आहेत.

YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना
Sanjay Raut News : ड्रग्जप्रकरणी मंत्री भुसे, फडणवीसांचा राजीनामा घ्या : संजय राऊत

२५ वर्षांचा आराखडा कौतुकास्पद

कौशल्य विकासावर आधारित अभ्यासक्रमातून अनेक युवकांना रोजगार मिळतोय. या शिक्षणाद्वारे आधुनिक रोजगाराच्या बाजारपेठेसाठी तरुण पिढी तयार होत असून, आजच्या स्पर्धेच्या युगात कौशल्य शिक्षण हे अनेकदा पारंपरिक पदवीधरांपेक्षा अधिक रोजगारक्षमता निर्माण करते. विद्यार्थ्यांची संख्या सध्याच्या पाच लाखांवरून १० लाखांपर्यंत दुप्पट करण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०३५ पर्यंत उच्चशिक्षण साध्य करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे शिक्षणातील एकूण नोंदणी प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत वाढविणे आवश्यक असून, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने या चळवळीत आघाडीवर राहावे. विद्यापीठाने दूरदर्शी विचाराने तयार केलेला २५ वर्षांचा आराखडा कौतुकास्पद असल्याचे बैस यांनी सांगितले.

YCMOU News : ‘मुक्त’च्या गुणपत्रिकेच्या पॅटर्न पोचणार राज्यभर; राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून विविध सूचना
Nashik News : मल्टिमोड्यूल हबचे 42 मजले हवेतच; एका बैठकीनंतर सारेच शांत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.