Malegaon : रुग्णांच्या जीवाशी खेळ! मालेगावच्या मुन्नाभाईला अटक; बोगस डॉक्टरचा भांडाफोड

अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचं समोर आलं आहे.
Malegaon Bogus Doctor
Malegaon Bogus Doctoresakal
Updated on
Summary

अनेकांच्या जीवाशी हे बोगस डॉक्टर खेळत असल्याचं समोर आलं आहे.

मालेगाव : गेल्या काही दिवसांपासून बोगस डॉक्टरांचं (Bogus Doctor) प्रमाण वाढलं आहे. सर्वसामान्य आणि अत्यंत गरीब कुटुंबातील रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार घेणं परवडत नसल्यानं हे रुग्ण जवळच्या डॉक्टरांकडं जाऊन उपचार घेतात. मात्र, जिल्ह्यात अनेक जण वैद्यकीय शिक्षण (Medical Education) न घेता प्रमाणपत्र नसताना देखील वैद्यकीय व्यवसाय करत असल्याचं समोर आलंय.

नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) मालेगाव (Malegaon) तालुक्यामध्ये एका बोगस डॉक्टरला अटक करण्यात आली. कोणतीही डिग्री नसताना वैद्यकीस सेवा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं चक्क दोन खोलीचं रुग्णालय थाटलं होतं. अखेर डॉक्टरवर कारवाई करण्यात आली आहे. मालेगावच्या दातार नगर भागात ही घटना उघडकीस आली.

Malegaon Bogus Doctor
युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना मोठा झटका; सरकारनं स्पष्टच सांगितलं, प्रवेश देऊ शकत नाही

रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि कमाई करणाऱ्या बोगस डॉक्टरांवर कठोरातली कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता लोकांकडून होऊ लागलीय. कुठलीही वैद्यकीय पदवी नसताना चक्क दोन खोलींचं रुग्णालय उभारणाऱ्या मालेगावातील या मुन्नाभाईचं नाव अन्सारी मोहम्मद वसीम हाजी अब्दुल रशिद असं आहे. मालेगावचा मुन्नाभाई असलेल्या या तरुणाला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. मालेगावच्या पवारवाडी पोलिसांकडून (Pawarwadi Police) याप्रकरणी पुढील कारवाई सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.