Nashik Crime: नाशिकमध्ये बोगस दस्तनोंदणी! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील प्रकार

fake document registration
fake document registrationesakal
Updated on

Nashik Crime : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील सहनिबंधक कार्यालयात जमिनीचे बोगस कागदपत्रे व बनावट खरेदीखत तयार करून त्या जमिनी विक्री करणारी टोळी कार्यरत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

माजी नगरसेवक शिवाजी सहाणे यांनी थेट सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार करीत दुय्यम निबंधकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (Bogus document registration in Nashik Type of office in premises of Collectorate Nashik Crime)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

fake document registration
Solapur Crime : तुला जिवंत सोडणार नाही म्हणत 16 जणांचा तरुणावर हल्ला; लाकूड, लाथाबुक्क्यांनी मारहाण

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस कागदपत्र तयार होतात, तशी टोळीच कार्यरत असल्याची तक्रार आहे. श्री. सहाणे यांच्या तक्रारीनुसार त्यांना गंगापूर शिवारातील सर्व्हे क्रमांक ५८ मधील प्लॉट क्रमांक ४ या मिळकतीची खरेदी करण्यासाठी योगेश तारगे या एजंटने संपर्क करीत गळ घातली.

त्यासाठी अगोदरच खरेदीखत झालेले असताना बोगस कागदपत्रे तयार करीत एका आठ ते दहा जणांच्या टोळीच्या मदतीने गंडविण्याचा प्रयत्न केला. तशी तक्रार सरकारवाडा पोलिस ठाण्यात केली आहे.

दरम्यान, या प्रकरणी दुय्यम निबंधक विजय राजुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो होऊ शकला नाही.

fake document registration
Nashik Bribe Crime: सातबाऱ्यावर नावनोंदणीसाठी मागितली 2 हजारांची लाच; त्र्यंबकच्या तलाठी, कोतवालास रंगेहाथ अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.