Bogus Medical Certificate Case : डॉ. सैंदाणे यांना 5 दिवसांची कोठडी

Dr. Saindane in police custody
Dr. Saindane in police custodyesakal
Updated on

नाशिक : आंतरजिल्हा बदल्यांसाठी पोलिस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी अटक करण्यात आलेला खासगी डॉ. स्वप्नील सैंदाणे व विवेक ठाकरे या दोघांना जिल्हा न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाचा कर्मचारी किशोर पगारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळला.

आंतरजिल्हा बदल्यांसाठी २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले होते. या प्रकरणाची उकल झाल्यानंतर नाशिक तालुका पोलिसात ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा कनोज, जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतिलाल गांगुर्डे, रेकॉर्ड विभागाचा कर्मचारी किशोर पगारे, खासगी डॉ. स्वप्नील सैंदाणे, डॉ. वीरेंद्र यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. (Bogus Medical Certificate Case 5 days custody to Dr Saindane Nashik Latest Marathi News)

Dr. Saindane in police custody
साडेदहा लाखांचे दागिने चोरणारा जावई गजाआड; चावी चोरून केली घरफोडी

यातील कनोज व गांगुर्डे यांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयित पसार होते. यातील सातपूरच्या अशोकनगरमधील प्रभावती हॉस्पिटलचे डॉ. सैंदाणे व साथीदार विवेक ठाकरे या दोघांना तालुका पोलिसांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा परिसरातून मंगळवार (ता.२७) अटक केली. दोघांना बुधवारी (ता.२८) जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या रेकॉर्ड विभागाचे किशोर पगारे यांनीही अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला असता जिल्हा न्यायालयाने तो फेटाळून लावला आहे. या प्रकरणात जिल्हा रुग्णालयाचे तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. श्रीवास यांचेही अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावले आहेत.

डॉ. निखिल सैंदाणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यावर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. डॉ. निखिल सैंदाणे, डॉ. श्रीवास हे गेल्या तीन आठवड्यांपासून जिल्हा रुग्णालयात आलेले नाहीत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Dr. Saindane in police custody
Fire Accident : गंगापूर रोडला E- Bikeने घेतला पेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.