नाशिक : पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अटक झालेले सातपूरमधील खासगी डॉ. स्वप्नील सैंदाणे व कंपाउंडर विवेक ठाकरे यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाने वाढ करण्यात आली. या प्रकरणात २१ बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रांपैकी पाच प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करण्यात आली आहे. त्यात तथ्य आढळून आल्याचे तालुका पोलिसांनी सांगितले. (Bogus Medical Certificate case 5 Facts on Authenticity Verification of Fake Certificates Nashik Latest Crime News)
पोलिसांच्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र प्रकरणी नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आंतरजिल्हा बदल्यांसाठी ज्या २१ पोलिस कर्मचाऱ्यांनी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यापैकी पाच प्रमाणपत्रांची तपासणी तालुका पोलिसांनी केली आहे. त्यात सत्यता आढळून आलली आहे. हृदयरोग व तत्सम गंभीर स्वरुरूपाच्या आजारांची शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यामुळे आता उर्वरित १६ प्रमाणपत्रांसंदर्भातील तपास तालुका पोलिसांकडून सुरू आहे.
तालुका पोलिसांनी डॉ. स्वप्नील सैंदाणे, विवेक ठाकरे या दोघांना गेल्या आठवड्यात अटक केली होती. कोठडी संपल्याने दोघांना सोमवारी (ता. ३) न्यायालयात हजर केले असता, त्यांच्या पोलिस कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली. तपासात संशयितांकडून ज्या पोलिस कर्मचाऱ्यांना शस्त्रक्रियेसाठी प्रमाणपत्र देण्यात आले होते, त्यासंदर्भातील कागदपत्रांची व त्यावरील हस्ताक्षरांची तपासणी करण्यसाठी तालुका पोलिसांकडून पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली होती. संशयित डॉ. सैंदाणे यांनी सर्जन पदवी नसताना शस्त्रक्रियेसाठीचे प्रमाणपत्र दिले होते. याप्रकरणात आत्तापर्यंत चौघांना अटक झाली आहे. यात २१ पोलिस कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.