Bogus Teacher Recruitment: शारदा विद्यामंदिराच्या शिक्षकांवर कारवाईचे आदेश

Fraud
Fraudesakal
Updated on

Bogus Teacher Recruitment : प्रकरण शाळा न्यायाधीकरणाकडे न्यायप्रविष्ट असतानाही रद्द केलेले बोगस मान्यता नियमित करणाऱ्या शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांनीच अखेर मान्यता रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश मंगळवारी (ता. ७) दिले.

नूतन शारदा सांस्कृतिक विकास मंडळ संचालित सातपूर महिंद्रा येथील शारदा प्राथमिक विद्यामंदिरात बोगस ठरावाद्वारे शिक्षक भरती केलेले गोकुळ हिरे, बारकू टकले, विशाल भोईर, जयश्री हाडोळे यांच्या मान्यता आदेश रद्द केले.

तसेच ‌त्यांचे शालार्थ आयडी गोठविण्याच्या सूचना देऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेशित केले आहे. (Bogus Teacher Recruitment Order of action against teachers of Sarada Vidya Mandir nashik crime news)

नूतन शारदा सांस्कृतिक विकास मंडळ संचालित सातपूर महिंद्रा येथील शारदा प्राथमिक विद्यामंदिरात बोगस ठरावाद्वारे शिक्षक भरती केल्याप्रकरणी २०२० मध्ये जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या संदर्भात वेळोवेळी सुनावण्या होऊन शिक्षण उपसंचालकांनी घेतलेल्या सुनावणीत संस्थाचालकांनी पुरावे सादर केले नाही.

वैशाली बोरवे आणि जयश्री हाडोळे यांच्या नियुक्ती आदेशासोबत जोडलेल्या ठरावावर भगवान ताजणे हे नाव अनुमोदक म्हणून नमूद करण्यात आले आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता, त्या दरम्यान भगवान ताजणे हे नाव संस्थेच्या रेकार्डवर नाही. तसेच सदरचा ठराव देखील संस्थेच्या प्रोसिडिंगवर नाही, अशी तक्रार होती.

२००४ मध्ये गोकुळ हिरे यांची कायम वैयक्तिक मान्यता मनपा प्रशासनाने रद्द केली होती. याबाबत संस्थाचालकांनी कोणताही प्रस्ताव दिलेला नसताना गोकुळ हिरे यांच्या अर्जावरून २००५ मध्ये त्यांचा मान्यता आदेश काढण्यात आला.

Fraud
Fraud Crime: योगीराम सुरतकुमार शैक्षणिक संस्थेत गैरप्रकार; डॉ अद्वय हिरेंसह 10 जणांविरोधात गुन्हा दाखल

मात्र त्या वेळी उपलब्ध विद्यार्थिसंख्येनुसार कार्यानुभव या विषयाचे पद निर्माण नसताना देखील अप्रशिक्षित शिक्षक म्हणून त्यांची मान्यता काढण्यात आली.

गोकुळ हिरे यांनी देणगीमध्ये मिळालेले संगणक गायब करणे, असे अनेक तक्रारदारांनी आरोप करून सखाराम सरकटे यांनी वेळोवेळी आक्षेप घेतले होते. त्यांनी सातपूर पोलिस यांच्याकडे २०२० मध्ये ऑनलाइन तक्रार देखील केली आहे.

३ जुलै २०२३ ला जिल्हाधिकारी कार्यालयांच्या पत्रानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने तीन वेळा सुनावण्या घेत जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे केलेल्या तक्रारीची चौकशी करीत शिक्षण उपसंचालकांनी चव्हाण यांना अधिकार असताना देखील बोगस शिक्षकांचे स्वतः दिलेले आदेश त्यांनी रद्द केलेले नाहीत.

तसेच गुन्हे दाखल करण्याचे कोणतेही आदेश न देता नाशिक महापालिका प्रशासन अधिकारी यांनी योग्य ती कारवाई करावी, असा शब्दप्रयोग करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते, असा तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते बापू पुजारी यांचे म्हणणे आहे.

Fraud
Karda Construction Fraud Case: बिल्डर नरेश कारडा यांच्या कोठडीत वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()