Nashik News: ‘शून्य कचरा’ उपक्रमाला बोहरी समाजाची साथ; मोहरमनिमित्त उपक्रम

मोहरमनिमित्त कुदबी मजीद येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविला
Citizens participating in the zero waste initiative of the Municipal Corporation.
Citizens participating in the zero waste initiative of the Municipal Corporation.esakal
Updated on

Nashik News : शहरातील बोहरी समाजाने सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून मोहरम सणानिमित्त ‘मोहरम आशाराम मुबारका’ कार्यक्रमात शून्य कचरा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक शहरांमध्ये द्वारका परिसरामध्ये बोहरी समाजाचे मोठ्या प्रमाण आहे. या समाजाचे धर्मगुरू सय्यदना मफुदल सैफुद्दीन यांनी महापालिकेच्या उपक्रमाला प्रतिसाद देण्याचे आवाहन केले होते.

शहरातील आठ हजार समाज बांधवांनी या आवाहनाला प्रतिसाद दिला. (Bohri community supports zero waste initiative Activities on occasion of Moharram Nashik News)

मोहरमनिमित्त कुदबी मजीद येथे आयोजित धार्मिक कार्यक्रमात शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रम राबविला. ११ दिवसांच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त समाजाच्या शहरातील दोन ते तीन प्रार्थना स्थळावर दररोज दोन ते अडीच हजार नागरिकांनी सहभाग नोंदविला.

या वेळी कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. ओला व सुका कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेटीची व्यवस्था करण्यात आली होती. कचरा वर्गीकरणाबाबत लहान मुलांकडून प्रबोधन करण्यात आले. कार्यक्रमात प्लॅस्टिकचा वापर टाळण्यात आला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Citizens participating in the zero waste initiative of the Municipal Corporation.
Nashik News: आदिवासी पाड्यांवरील गळक्या घरांना फ्लेक्स; ‘क्रेडाई’ची संकल्पना

प्लॅस्टिकऐवजी बटाटा स्टार्चपासून तयार करण्यात आलेल्या विघटनशील पिशव्या वापरण्यात आल्या. या वेळी प्लॅस्टिक वापराचे दुष्परिणाम सांगण्यात आले. यापूर्वी प्लॅस्टिकपासून वह्या, पेन्सिल तयार करण्याचा उपक्रमदेखील राबविण्यात आला आहे.

पर्यावरण रक्षणासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रमदेखील येथे राबविण्यात आला. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालक डॉ. कल्पना कुटे यांनी कुतबी मशीद येथे भेट देऊन पाहणी केली.

पर्यावरणप्रेमी राजेश पंडित व अमीरसाहेब तमिम भाई, अम्मर मियाजी, अलीबेन कागलवाला, दुरिया बेन अबुजीवाला आदी उपस्थित होते.

Citizens participating in the zero waste initiative of the Municipal Corporation.
Nashik Dengue Update : शहरात डेंगीचाही वाढता विळखा...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.