Plastic Pollution : बॉयलर पेटतो प्लास्टिक कचऱ्याने! लखमापूर परिसरातील वास्तव

Boiler file photo
Boiler file photoesakal
Updated on

Plastic Pollution : औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना बॉयलर पेटविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनाबाबत निकष ठरवून दिलेले असतात, जेणेकरून त्यातून वातावरणाचे कमीत कमी प्रदूषण व्हावे हा उद्देश असता.

मात्र लखमापूर परिसरातील काही कंपन्या रात्रीच्यावेळी या नियमांचे सर्रास उल्लंघन करीत असल्याचे ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आले आहे. या कंपन्या इंधनाऐवजी शहरातून गोळा केलेला प्लास्टिक कचरा, बूट, खुर्च्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या अशा वस्तूंचा वापर करत असल्याने समोर आले आहे.

यामुळे होणारे वायू प्रदूषण आणि काजळीमुळे द्राक्षबागांचे मोठे नुकसान होत असून प्रदूषण नियंत्रण महामंडळ मात्र कुणी तक्रार करतो का याची वाट पाहत आहे हे आणखी धक्कादायक आहे. (Boiler burns with plastic waste Reality in Lakhmapur industrial area nashik news)

ग्रामीण भागातील अर्थकारण मजबूत होऊन परिसराचा मोठा विकास होण्यासाठी शासनाने ग्रामीण भागातील उद्योगांना मोठ्या सुविधा व सवलती दिल्याने उद्योग व्यवसाय वाढीस लागले. यामुळे काहीशी आर्थिकदृष्ट्या प्रगती झाली.

मात्र अशा काही कंपन्यांमुळे त्याची किंमतही स्थानिकांना मोजावी लागत आहे. येथील उद्योगांवर कुणाची मेहरबानी आहे की काय म्हणून परिसरातील कंपन्या बॉयलरमध्ये आवश्‍यक पदार्थ जाळण्याऐवजी शहरातील प्लास्टिक कचरा, चप्पल-बूट, पाण्याच्या रिकाम्या बाटल्यांचे अवशेष जाळत असल्याचे ग्रामपंचायतीच्या समोर आल्याने या उद्योगांवर कुणाचा वाचक आहे की नाही की आशीर्वाद आहेत असे म्हणण्याची वेळ स्थानिकांवर आली आहे.

रात्रीस खेळ चाले......

मध्यंतरी प्रचंड प्रदूषणामुळे लखमापूरच्या एका पेपर मिलचे उत्पादन बंद पाडून बॉयलरसाठी आवश्‍यक उत्पादन वापरले जात नाही तोपर्यंत कंपनी बंद केली, खरे मात्र काही कंपन्यांनी हा काळा धूर दिवसा दिसत असेल तर नामी शक्कल लढवत रात्री प्लास्टिक जाळण्याचा प्रकार चालविला आहे.

कंपनीची ही मनमानी ग्रामपंचायत सदस्यांनाच समोर आल्याने प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायत आता या मुद्द्यावर न्यायालयात जाण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Boiler file photo
SAKAL Exclusive : मागेल त्याला फळबाग, ठिबक, हरितगृह! शेतीसाठी साहित्य वेळेत मिळणार

प्लास्टिक जाळण्यामुळे निर्माण होणारी काजळी सकाळी आकाशात दिसून येते. लगतच्या पिकांवरही ती पसरलेली दिसते. काही केमिकल कंपनीच्या रासायनिक पदार्थांमुळे परिसरातील जलस्रोत दूषित होत असल्याचेही समोर आले आहे.

नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही एकाही कंपन्यांना त्याबाबत नोटीस अथवा आवश्‍यक त्या उपाययोजना करण्यात न आल्याने स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियामक मंडळाच्या भूमिकेबाबतही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले आहे.

"नियमित कामकाजासाठी जात असताना लखमापूरजवळील कंपनीच्या बॉयलरमधून मोठ्या प्रमाणात काळा धूर दिसत होता, जेव्हा कंपनीच्या आत प्रवेश केला तेव्हा बॉयलरसाठी प्लास्टिक कचरा वापरला जात असल्याचे लक्षात आले. कंपनीला ग्रामपंचायतीतर्फे सक्त ताकीद देण्यात आली आहे." - भरत मेसट, ग्रामपंचायत सदस्य, लखमापूर.

"काही कंपन्या नियम धाब्यावर बसवत चुकीची कामे करत असल्याच्या काही तक्रारी आल्यानंतर अशा कंपन्यांना ताकीद तर काहींना दंड म्हणून कंपनी बंद करण्याची कारवाई झालेली आहे. भविष्यात अशा प्रकारे नियम पायदळी तुडविताना दिसल्यास ग्रामपंचायत सदस्य व प्रशासन कडक कारवाई करेल, प्रसंगी न्यायालयातही जाऊ."

- संगीता दळवी, सरपंच, लखमापूर.

"औद्योगिक क्षेत्रात प्रदूषणाबाबत काही तक्रारी असल्यास जनतेने त्या प्रदूषण महामंडळाकडे पाठवाव्या. त्याचा योग्य तपास करून दोषी असलेल्या उद्योगांवर नक्कीच कारवाई करण्यात येईल."- अमय दुरघुले, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ,

Boiler file photo
Nashik : निकृष्ट गतिरोधकामुळे निष्पापांचा बळी? नाशिक- कळवण रस्त्यावरील वलखेड फाटा बनला अपघातांचे ठिकाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.