Nashik News: मुद्रणालय कामगारांना 16 हजारांचा बोनस

Notes
Notesesakal
Updated on

Nashik News : नाशिक रोड येथील भारत प्रतिभूती व चलार्थपत्र मुद्रणालयातील कामगारांना या वर्षी १६ हजाराचा दिवाळी बोनस मिळणार आहे. कामगारांना आतापर्यंतचा हा सर्वात जास्त बोनस आहे. कामगारांनी आनंदोत्सव साजरा केला. (Bonus of 16 thousand to note printing workers Nashik News)

२०१२ पर्यंत प्रेस कामगारांना २,४६७ रुपये बोनस मिळत होता. २०१२ नंतर सत्ता परिवर्तन झाले. प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी प्रशासनाशी यशस्वी चर्चा केल्याने बोनस रकमेत दहा हजारापर्यंत वाढ झाली.

हे नेते यंदाही बोनसवाढीसाठी प्रयत्नशील होते. होशंगाबाद, पंचमढी (मध्य प्रदेश) येथे देशभरातील प्रेस कामगार नेते व प्रेस व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची बैठक झाली. नाशिक रोड प्रेस मजदूर संघाच्या नेत्यांनी बोनसमध्ये वाढ करण्याची मागणी केली.

त्यानंतर या प्रश्नी सप्टेंबरमध्ये नवी दिल्लीत प्रेस व्यवस्थापनासमवेत विशेष बैठक झाली. त्यात या वर्षीच्या बोनसमध्ये वाढ करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

Notes
Navratrotsav Festival 2023: यंदा प्रथमच कालिका देवी नवरात्रोत्सव कोजागरी पौर्णिमेपर्यंत!

प्रेस महामंडळाचे संयुक्त महाव्यवस्थापक (मनुष्यबळ विकास) प्रकाशकुमार यांनी १६ हजाराचा बोनस देण्याचे परिपत्रक काढले. ते नाशिक रोड प्रेस मजदूर संघाला प्राप्त झाले.

नाशिक रोड प्रेससह देशभरातील सर्व प्रेस कामगारांच्या खात्यात लवकरच बोनसची रक्कम जमा होईल, अशी माहिती जगदीश गोडसे, ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी दिली.

मजदूर संघाचे उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, राजाभाऊ जगताप, संतोष कटाळे, अविनाश देवरूखकर, इरफान शेख, अशोक जाधव, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे, योगेश कुलवधे, बाळासाहेब ढेरिंगे, अशोक पेखळे, बबन सैद, राहुल रामराजे, अण्णा सोनवणे आदी उपस्थित होते.

Notes
Success Story: महाराष्ट्राचा 'बेअर ग्रिल्स' प्रशील अंबादेने सर केले जगातील सर्वांत उंच शिखर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.