Nashik News: नाट्य चळवळीत वर्षभरात कलावंतांना बूस्टर! नाट्य परिषदेचे उपक्रम

बाल रंगभूमीतून बालकलाकरांना पुन्हा मिळणार मंच
Kalidas Kala Mandir
Kalidas Kala Mandiresakal
Updated on

Nashik News : येथील कलावंतांना प्रोत्साहन मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने वर्षभरात विविध उपक्रम राबविले जातात.

नाट्य परिषदेचे काही उपक्रम सुरळीत होण्यासाठी परिषदेची शाखा गत वर्षभरापासून प्रयत्नशील आहेत. जुलैपासून बंद पडलेले काही उपक्रम सुरू करण्यात आले असून, नाट्य चळवळीत येत्या वर्षभरात नाशिकच्या कलावंतांना बूस्टर मिळणार आहे. (Boosters for artists in theater movement year Activities of Natya Parishad Nashik News)

नाट्य परिषदेची नाशिक शाखा वर्षभरात विविध उपक्रमांतून कला क्षेत्रातील कलावंतांना संधी देत असते. कलावंतांच्या विविध योजनांसाठीही लाभार्थी कलावंतांना नाट्य परिषदेकडून सहाय्य करण्यात येते.

वर्षभरात राबविण्यात येणारे बालनाट्य, महिला, प्रौढ शिबिर, (कै.) अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, कलावंत मेळावा, दर महिन्याला अभिवाचन, काव्यवाचन, बालनाट्य स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धेतील कलावंतांना सहाय्य, कामगार कल्याण नाट्य स्पर्धा, तसेच नाट्य क्षेत्रातील दिवंगत रंगकर्मींना वारसदार गौरव आदींचा समावेश आहे.

उपक्रमांमधून नाशिकच्या जवळपास दोन हजार कलावंतांना संधी मिळत आहे. त्यात बालनाट्यापासून राज्य नाट्य स्पर्धेतील कलांवत, बॅकस्टेज आर्टिस्ट यांचा समावेश आहे. गत वर्षभरात नाशिकच्या कलावंतांनी कात टाकली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Kalidas Kala Mandir
Nashik NCP News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी रंजन ठाकरे

आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्येही नाशिकचे विद्यार्थी चमकले आहेत. नाशिक कवींचा दर महिन्याला होणारा कार्यक्रम जुलै महिन्यापासून सुरू झालेला आहे. तसेच नाट्य अभिवाचनाचे विविध कार्यक्रमही होत आहे.

महाकवी कालिदास कलामंदिरात नाट्य परिषदेच्या माध्यमातून नाटकच्या मध्यांतरला नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जनजागृतीही केली जात आहे.

नाट्यगृह मंदिरासारखेच असल्याचे महत्त्व पटवून दिले जात आहे. बाल रंगभूमीची कार्यकारिणीही निश्चित करण्यात आली असून, बालकलावंतांसाठीही यंदा स्पर्धा होणार आहेत.

"नाट्य परिषदेच्या उपक्रमांमधून नाट्य चळवळीला बूस्टर देण्याचे काम सुरू आहे. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, स्थानिक कलावंतांना पुरस्कार सुरू करण्यात आले असून, नाट्य परिषदेचा हॉलही विविध कलावंतांना उपलब्ध करून दिला आहे. महाकवी कालिदास कलामंदिरात जनजागृती करण्यात येत आहे. वर्षभरातील विविध उपक्रमांतून दोन हजार कलांवतांना फायदा होत आहे." - रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्य परिषद नाशिक शाखा

Kalidas Kala Mandir
Sharad Pawar: शरद पवारांचे देवळाली मतदारसंघाकडे लक्ष! दिल्लीतील आढावा बैठकीत उमेदवार शोधण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()