केवळ दैव बलवत्तर म्हणून..! बहिण-भाऊ साक्षात मृत्यूच्या दाढेतून परतले; घटनेने दोघेही हादरले

sakal (27).jpg
sakal (27).jpg
Updated on

पांदुर्ली (जि.नाशिक) : वेळ सकाळी सव्वा सहाची .. महाविद्यालयात बसने जाण्यासाठी शेतमळ्यातून मोटारसायकलवरून बहिण- भाऊ जात असतानाच साक्षात मागून आलेल्या काळाला परतावून लावले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे दोघेही हादरून गेले आहे.

केवळ दैव बलवत्तर म्हणून...!

पांदुर्ली शिवारातील वाजे वस्तीवर राहणारा यश अशोक वाजे (वय १४) हा आपली बहिण तृप्ती रवींद्र तांबे (वय १७) हि महाविद्यालयात जाण्यासाठी मोटारसायकलवरून पांदुर्ली बस स्तनद कडे सकाळी सव्वा सहाच्या सुमारास येत होता. रस्त्यावरील कोळ-ओहोळ नाल्याजवळून येत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक मोटारसायकलवर हल्ला चढविला. यशने मोठ्या जीवाच्या आकांताने मदतीसाठी वाचवा वाचवा अशा आरोळ्या देत प्रसंगावधान राखून मोटारसायकल वेगाने पुढे हाकलली. यातच बिबट्याने झडप घातल्याने यशच्या उजव्या पायाच्या पोटरीजवळ तीन दात घुसले तर तृप्तीच्या उजव्या मांडीला एक दात लागल्याने दोघेही जखमी अवस्थेत गावात पोहचले.

कॉलेजच्या बॅगमुळे वाचला जीव

तृप्तीच्या पाठीवर कॉलेजची बॅग असल्याने दोघेही बिबट्याच्या प्राणघातक हल्यातून किरकोळ दुखापतीमुळे सुखरूप राहिले. दोघांवर पांदुर्लीतील प्राथमिक दवाखान्यातील उपचारानंतर घरी सोडण्यात आले. दोघांचीही प्रकृती चांगली आहे.अचानक घडलेल्या हा घटनेमुळे दोघेही हादरून गेले आहे. नरभक्षक होत असलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्वरित सापळा रचावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

वारणेच्या पट्ट्यात नेहमीच बिबट्यांचा दिवस-रात्र संचार
दारणा नदी व कोळ ओहळ नाल्यामुळे मुबलक पाणी तसेच ऊस, मक्याची शेती व लपण्यासाठी झाडी असल्याने या वारणेच्या पट्ट्यात नेहमीच बिबट्यांचा दिवस-रात्र संचार सुरू असतो. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री आपली पाळीव जनावरांना घरातील पडव्यांमध्ये ठेवून काळजी घ्यावी लागते. वस्तीवरील अनेक कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे. शेतपिकांना पाणी देणे तसेच शेतीच्या मशागतीसाठी जीव मुठीत धरावा लागत आहे.

किरकोळ जखमा

या हल्यापासून हा बहिण भावाची सुटका झाली. परंतु बिबट्याने पुन्हा पाठलाग केल्याने पाठीवर असलेल्या बॅगमुळे मोठा अनर्थ टळला. या हल्यात दोघानांही बिबट्याने चावा घेण्याचा प्रयत्न केल्याने किरकोळ जखमा झाल्या. हि घटना पांदुर्ली शिवारातील कोळओहाळ शिवारातील चारण बाबा समाधी स्थळाजवळ रस्त्यावर घडली. वनखात्याने या बिबट्याचा त्वरीत बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.