Bafna Crime Case : अखेर विपीनच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा!

Court Order
Court Orderesakal
Updated on

नाशिक : महाविद्यालयीन २२ वर्षीय विद्यार्थी विपीन बाफना याचे अपहरण करून १ कोटी रुपयांची खंडणीची मागणी करून त्याचा निर्घृण खून केल्याप्रकरणी नाशिक अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने चेतन पगारे त अमन जट या दोघांना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. या पार्श्वभूमीवर न्यायालय आवारात पोलीस बंदोबस्तामुळे छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. तर निकालानंतर आरोपी पगारे याच्या आईने न्यायालयाबाहेर आरडाओरडा करीत गोंधळ घालण्याच्या प्रयत्न केला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आदिती कदम यांनी बंद दाराआड या खटल्याचा निकाल दिला.

Court Order
Nashik News : कसमादे भागात ‘कांदा एके कांदा’; 50 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचा अंदाज

चेतन यशवंतराव पगारे (२५, रा.ओझर टाऊनशिप), अमन प्रकटसिंग जट (२२, रा,केवडीबन, पंचवटी) या दोघांना न्यायालयाने गेल्या मंगळवारी दोषी ठरविले होते. तर, अक्षय उर्फ बाल्या सुरज सुळे (२१, रा.नांदुरनाका), संजय रणधीर पवार (२७, रा.महालक्ष्मी चाळ, बागवानपुरा) आणि पम्मी भगवान चौधरी (३२, रा. भारतनगर, वडाळारोड) यांची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे, विपीन याचे ९ जुने २०१३ रोजी आरोपींनि अपहरण केले होते. याप्रकरणी पंचवटी पोलिसात बेपत्ताची नोंद दाखल होती.

यानंतर आरोपींनी त्याचा खून केला आणि त्याच्या पालकांकडे एक कोटीची खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी अपहरण, खून आणि खंडणीचा मोक्कान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या ९ वर्षापांसून जिल्हा व सत्र न्यायालयात विशेष न्यायालयात याप्रकरणी खटला सुरु होता, या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी कामकाज पाहिले.

तत्कालीन सहायक पोलीस आयुक्त गणेश शिंदे यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले, यात सरकारी पक्षाने ३४ साक्षीदार तपासले. सदरील खटल्याच्या पार्श्वभूमीवर कोर्टाच्या आवारात पोलिसांचा कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Court Order
Nashik News : सत्र पूर्ण करण्याची हुकणार Deadline!; अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे आव्‍हान

तिघांबाबत अपील विचाराधीन

या खटल्यात निर्दोष सुटका करण्यात आलेल्या तिघांबाबत सरकार पक्षातर्फे अपील करण्याची शक्यता आहे, खटल्याच्या निकालाची प्रत आल्यानंतर या बाबत निर्णय घेतलं जाणार आहे. या खटल्यातील पाच जणांविरोधात मोक्कानव्ये खुनाचा गुन्हा दाखल होता. त्यामुळे निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांची प्रत्यक्ष खुनात सहभाग नसला तरी कटात वा मुख्य आरोपीना त्यांनी मदत केली आहे. त्याआधारे अपील करण्याची शक्यता सरकारी पक्षाने व्यक्त केली आहे.

तपासाचा उलटा प्रवास

सदरील खटल्यात मयत विपीन हा आरोपीसमवेत होता हे सिद्ध होत असले तरी त्याचा प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. पोलिसांना हे सिद्ध करण्यासाठी तांत्रिक माहितीचा आधार घ्यावा लागला. आरोपीमधील फोन व वापरलेले कार्ड सापडले नाही. त्यामुळे पोलिसांनी विपिनच्या पालकांना खंडणीसाठी आरोपींची जे फोन केले त्याचे टॉवर लोकेशन आणि त्यावरून फोन नंबर याआधारे सीडीआर रिपोर्टच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले.

आरोपींनि वापरलेले फोन चोरीचे होते. मोबाईलच्या ईएमआय क्रमांकावरून माहिती समोर आली. त्यावरूनच आरोपींकडे विपीनचा एसटीचा पास, त्याचे कपडे सापडले होते. असा तपासाचा उलटा प्रवास करून पोलिसांनी गुन्हयांची उकल केली, हेच विश्लेषण न्यायालयात महत्वाचे ठरले.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

Court Order
Devendra Fadnavis : उद्योगस्नेही धोरणांवर भर... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिनाभरापासून प्लँनिंग

विपीनचे अपहरण करण्यापूर्वी आरोपींनी गुन्हाचा कट रचला होता. महिनाभरापूर्वीच त्यांनी अक्षय सुळे व संजय पवार यांच्या माध्यमातून फ्लॅट घेतला. तेथे गाद्या आणल्या. रिक्षातुन विपिनला नेणे. त्यामुळे आरोपींची प्लांनिंग करून विपिनचे अपहरण केले आणि त्याची निर्घृण हत्या केली. आरोपींनि विपीनच्या शरीरावर २६ वार करून त्यास मारले.

ठसे देण्यास नकार

न्यायालयात आरोपी चेतन पगारे व अमन जट या दोघांना आज आणण्यात आले होते. न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते. न्यायालयात त्याचे वर्तनही मुजोरीचेच दिसून आले. निकालानंतर आरोपींच्या हाताच्या बोटांचे ठसे घेतले जातात. त्यासाठी पोलीस आले असता आरोपींनी ठसे देण्यास नकार दिला. तर, न्यायालयातून आरोपींना पोलीस गाडीतून मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात असताना आरोपी पगारे याच्या आईने न्यायालय आवारात गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वाराबाहेर काढले.

Court Order
Pathaan: दिपिकाच्या भगव्या बिकिनी वादावर नवनीत राणांचां जालीम उपाय..

Adv मिसर यांच्याकडील खटलात दहावी फाशी

एडवोकेट अजय मिसर यांनी सरकारी पक्षातर्फे बाजू मांडताना आत्तापर्यंत आठ आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे यामध्ये या खटल्यातील दोघ आरोपींचा समावेश झाल्याने आता दहा आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे यामध्ये सातवते प्रकरणात सहा आरोपींचा समावेश आहे

"सदरचा खटला अत्यंत क्लिष्ट स्वरूपाचा होता यामध्ये प्रत्यक्ष साक्षीदार नसल्याने संपूर्ण तपास हा तांत्रिक मुद्द्यांच्या आधारावर अवलंबून होता त्यानुसार दोघा आरोपींना फाशीची शिक्षा झाली आहे ज्या तीन आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे त्याबाबत न्यायालयाचे निकालाचे कागदपत्र हाती आल्यानंतर त्याचा कायदेशीर अभ्यास करून अपील करण्याचा निर्णय घेतला जाईल"- ऍड. अजय मिसर, विशेष जिल्हा सरकारी वकील.

Court Order
PNB Fraud Case : नीरव मोदीचं होणार प्रत्यार्पण! दोषी ठरल्यास किती वर्षांची होईल शिक्षा?

असा होता घटनाक्रम

9 जून 2013 : विपीनचे अपहरण

10 जून 2013 : पंचवटी पोलिसात मिसिंग दाखल

11 जून 2013 : आरोपींकडून खंडणीसाठी संपर्क

11 जून 2013 : पंचवटी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल

13 जून 2013 : आडगाव शिवारात विपीनचा मृतदेह सापडला. पंचवटी पोलिसात अपहरण, खंडणी, खुनाचा गुन्हा दाखल

15 जून 2013 : आरोपींना अटक

13 डिसेंबर 2022 : न्यायालयात अंतिम सुनावणी. दोघे दोषी तर तिघांची निर्दोष मुक्तता

15 डिसेंबर 2022 : न्यायालयात अंतिम युक्तिवाद

16 डिसेंबर 2022 : दोघा आरोपींना फाशीची शिक्षा

बंद दाराआड सुनावली फाशीची शिक्षा

अत्यंत संवेदनशील खटला असल्याने न्यायालयाच्या आवारात निकालापूर्वीच कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता. न्यायालयाबाहेर विशेष पोलीस दलाचे पथक तैनात करण्यात आलेले होते तर न्यायालय कक्षाच्या बाहेरही पोलिसांची फौज तैनात होती न्यायाधीश आदिती कदम यांच्या आदेशानुसार कोर्ट रूम मध्ये सरकार पक्षाचे वकील, पक्षकाराचे वकील व आरोपीचे वकील, आरोपी आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना प्रवेश देण्यात आला नाही. यामुळे निकाल पत्र ऐकण्यासाठी आलेल्या वकिलांसह अनेकांचा हिरमोड झाला.

Court Order
Sushma Andhare Vs Sunita Andhale: सुषमा अंधारेंचा कीर्तनकार सुनिता अंधाळेंवर पलटवार; म्हणाल्या, स्वतःला...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.