गेमसाठी मोबाईल न दिल्याने मुलाची आत्महत्या

आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग आल्याने येथील सहावीतील मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली.
child Abuse suicide
child Abuse suicideesakal
Updated on

नैताळे : आईने गेम खेळण्यासाठी मोबाईल न दिल्याचा राग आल्याने येथील ऋषिकेश जालिंदर सुरासे (१२) या सहावीतील मुलाने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत. (Latest Marathi News)

नैताळेच्या पश्चिमेला नाशिक औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या आदिवासी वस्तीमध्ये जालिंदर सुराशे व पत्नी भारती सुरासे दोन मुलांसह राहतात. पती-पत्नी दोघे दररोज मोलमजुरी करून कुटूंब चालवितात. त्यांचा मोठा मुलगा सहावी तर दुसरा तिसरीत जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकतात. आदिवासी वस्तीतील अतिशय गरजू आणि गरीब विद्यार्थी असल्याने त्यांना आदल्या दिवशी शालेय गणवेश देण्यात आला होता. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना १४ ऑगस्टला दुपारी तीनच्या दरम्यान सहावीत शिकणाऱ्या ऋषिकेशने आईकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. भारती सुरासे यांनी मुलाच्या भविष्याचा विचार करता तू मोबाईलवर गेम खेळू नकोस, अभ्यास कर अस म्हणत नकार दिला.

child Abuse suicide
पोटाची खळगी भरण्यासाठी काळूबाबांचा 20 किलोमीटर पायी प्रवास

त्या आपल्या कामाचा भाग म्हणून बाजार करण्यासाठी बाहेर गेल्या असता काही वेळाने भारती सुरासे या घरी आल्या. त्यांना ऋषिकेश दिसेना म्हणून त्यांनी शेजारील खोलीत डोकाऊन बघितलं तर ऋषिकेशने ओढणीच्या सहाय्याने आत्महत्या केल्याचे दिसल्याने त्यांनी हंबरडाच फोडला. घटनेची माहिती पोलिसांना कळविण्यात आली. पोलिसानी घटनेचा पंचनामा करुन आकस्मिक मृत्यूची नोंद केली. निफाड येथे विच्छेदनानंतर ऋषिकेशचा मृतदेह कुटुंबियाच्या ताब्यात दिला. त्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आदिवासी वस्तीमध्ये राहणारा ऋषिकेश सुराशे हा हुशार विद्यार्थी होता. शाळेतर्फे त्याला गणवेशही देण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच मुख्याध्यापक पांडुरंग कर्डिले यांच्यासह सर्व शिक्षकांनी ऋषिकेशच्या घरी जाऊन त्याच्या आई-वडिलांचे सांत्वन केले.

child Abuse suicide
MPSC B.Ed CET परिक्षा एकाच दिवशी; परीक्षार्थींना सरकारचा दिलासा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()