Teacher Protest : शासकीय- अनुदानित आश्रमशाळा शिक्षकांसह कर्मचाऱ्यांचा शिक्षक गौरव दिनावर बहिष्कार

Protest
Protestsakal
Updated on

Teacher Protest : आदिवासी विकास विभागातील राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक-कर्मचारी मंगळवारच्या (ता. ५) शिक्षक गौरव दिनावर बहिष्कार टाकणार आहेत. काळ्या फिती लावणार आहेत.

प्रलंबित मागण्यासाठी निषेधदिन पाळण्यात येणार आहे, असा इशारा सीटू संलग्न आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक-कर्मचारी संघटनेतर्फे देण्यात आला आहे. (Boycott of government aided ashram school teachers and staff on Teachers Appreciation Day nashik news)

सीटू संलग्न संघटनेतर्फे २३ ऑगस्टला मुंबईतील आझाद मैदानावर शाळेची वेळ बदलून पूर्वीप्रमाणे सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी करण्यासह प्रलंबित मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन केले. आदिवासी विकास प्रशासन आणि आदिवासी विकास मंत्री यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी १५ दिवस निवेदन देऊनही कोणतीही चर्चा केली नाही.

आंदोलनावेळी मंत्र्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केल्याने सकाळी पावणेनऊ ते सायंकाळी पाच ही वेळ विद्यार्थी, पालकांसह कर्मचाऱ्यांसाठी गैरसोयीची ठेवली. त्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आल्याचे संघटनेतर्फे स्पष्ट करण्यात आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Protest
Nashik Zika Virus : नाशिकमध्ये ‘झिका’चा धोका? इचलकरंजीत रुग्ण आढळल्यानंतर महापालिका अलर्ट मोडवर

संघटनेतर्फे १६ मागण्या

संघटनेतर्फे आंदोलनानिमित्ताने १६ मागण्या केल्या आहेत. त्यातील काही मागण्या अशा : जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. केंद्राप्रमाणे निवृत्तीचे वय ६० वर्षे करण्यात यावे. शाळा आणि वसतिगृह विभाग वेगळा करण्याबाबत सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी. नवीन आकृतिबंध रद्द करून रद्द झालेली पदे पुनर्रज्जीवत करावीत.

रोजंदारी वर्ग तीन व चार आणि कंत्राटी तत्त्वावरील कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावे. बाह्य स्त्रोताद्वारे भरती प्रक्रिया कायमस्वरूपी रद्द करावी. आदिवासी विकास विभागातील कार्यालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे १०-२०-३० वर्षाची त्रिस्तरीय वेतनश्रेणी शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील शिक्षक संवर्गाला लागू करावी.

दहावी, बारावीचा निकाल ८० व ५० टक्क्यांपेक्षा कमी लागल्यास वेतनवाढ रोखण्याची कार्यवाही रद्द करावी. शिक्षकांना विश्‍वासात घेऊन गुणवत्तावाढीसाठी नियोजन करावे.

Protest
Teacher Protest : शिक्षक दिनी काळ्या फिती लावणार; शिक्षकांचे आंदोलन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.