Nashik News: विद्यापीठ परीक्षांवर बहिष्काराचा इशारा!

अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघातर्फे २० फेब्रुवारीपासून कामबंद
Nashik News
Nashik Newsesakal
Updated on

Nashik News: महाराष्ट्र राज्य अशासकीय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाची बैठक बुधवारी (ता.१८) एचपीटी महाविद्यालयात झाली. प्रलंबित मागण्या मान्‍य न झाल्‍यास विद्यापीठाच्‍या परीक्षांवर बहिष्कार घालण्याचा इशारा बैठकीनंतर दिला आहे.

आंदोलनाच्‍या पुढील टप्‍यात २० फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन छेडले जाणार असल्‍याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. (Boycott Warning on University Strike from February 20 by Non Government Non Teaching Staff Federation Exams Nashik News)

बैठकीत अशासकीय शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या आश्वासित प्रगती योजना, सातवा वेतन आयोग तसेच विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत अन्‍य विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली. या मागण्यासंदर्भात शासकीय स्‍तरावर पाठपुरावा सुरू आहे. मागण्या मान्य न झाल्यास परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकून बेमुदत काम बंद आंदोलनचा इशारा दिला आहे.

अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असे निश्‍चित करण्यात आले. २० फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा बैठकीदरम्‍यान मुख्य संघटक रावसाहेब त्रिभुवन यांनी दिला. बैठकीस अन्‍य पदाधिकारीदेखील उपस्‍थित होते.

हेही वाचा : शेअर बाजारात सततचे लाॅसेस? मग यापैकी कुठली चूक होतेय? घ्या जाणून

Nashik News
Nashik Graduate Constituency : सत्यजित तांबे यांचे पारडे अधिक जड! शिक्षकभारतीचा बिनशर्त पाठिंबा

आंदोलनाचे टप्पे असे-

कृती समितीने आंदोलनाचे टप्पे जाहीर केले आहेत, त्‍यानुसार २ फेब्रुवारीपासून होऊ घातलेल्‍या परीक्षांच्‍या कामकाजावर बहिष्कार घातला जाईल. १४ फेब्रुवारीला अवकाश काळात निदर्शने केली जातील.

१५ ला काळ्या फिती लाऊन कामकाज तर १६ फेब्रुवारीला लाक्षणीय संप केला जाणार आहे. तरीही मागण्या मान्‍य न झाल्‍यास २० फेब्रुवारीपासून सर्व अकृषी विद्यापीठे व संलग्‍नित महाविद्यालये बेमुदत कामबंद आंदोलन पुकारणार असल्‍याचे जाहीर केले.

"प्रलंबित मागण्यांसाठी विभागाच्‍या मंत्र्यांशी पुण्यात भेट घेतली होती. त्‍यानंतर मुंबईत बैठक घेण्याचे निश्‍चित झाल्‍यानंतर वारंवार चकरा मारुनही अद्याप बैठक झालेली नाही. त्‍यामुळे आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागतो आहे." - रावसाहेब त्रिभुवन, मुख्य संघटक.

Nashik News
Nashik News : विकास आराखड्यांच्या निकषात ग्रामपंचायतींसाठी झाला बदल!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.