Nashik News: ब्रह्मगिरीच्या अहिल्या तलावाची गळती दुरुस्ती; भरपावसात काम सुरू

Bramhagiri
Bramhagiriesakal
Updated on

Nashik News : ‘सह्याद्रीचे उत्पत्तीस्थान’, असे पुराणांनी वर्णन केलेल्या ब्रह्मगिरीच्या अहिल्या तलावाची गळती काढण्याचे काम सुरू झाले असून, भरपावसात दोन दिवसांच्या अथक खोदाईनंतर गळती होत असलेल्या ठिकाणी एक चिंचोळा परंतु मोठ्या लांबीचा बोगदा सापडविण्यात यश आले आहे.

रेन्बो फाउंडेशनच्या या कामास ‘सकाळ’ सोशल फाउंडेशनचे सहकार्य लाभत आहे. (Brahmagiri Ahilya Lake leak repair Work started in abundance Nashik News)

यंदा इतिहासात प्रथमच ब्रह्मगिरीवर गंगा उगम व सूर्यकूंड वगळता सर्वच्या सर्व तळी टाकी आटून गेली होती. वन्यजीवांना, तसेच गडावरील मेटां, तसेच भाविकांसाठी प्रसादी माल, तथा हारफुले विकणाऱ्या मेटकऱ्यांना व भाविकांसाठी पाण्याचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला होता.

मेटकऱ्यांनी वन विभागाकडे पाठपुरावा केला, तसेच रेन्बो फाउंडेशनला अहिल्या तलावाची गळती काढण्यासाठी साकडे घातले होते. वन विभागाकडून परवानगी मिळाल्यानंतरही मजुरांची जुळवाजुळव, तसेच विविध नद्यांवरील जलसंवर्धन अशा धावपळीत पाऊस सुरू होण्याच्या एक दिवस अगोदर गळती काढण्याच्या कामाला हात घालण्यात आला.

नदीच्या पुनरुज्जीवनासाठी पुढाकार घेणारे महाराष्ट्र दुर्ग संवर्धन समितीचे सदस्य तथा रेन्बो फाउंडेशनचे सचिव प्रशांत परदेशी यांनी मेटकऱ्यांच्या अनुभवाच्या मदतीने सह्याद्रीतल्या एका सर्वाधिक उंचीवर आव्हानात्मक अशा डोंगर भागात फार थोड्या वेळात ही गळती शोधून काढण्याचे आव्हान स्वीकारले व त्याला पावणेदोन दिवसांच्या प्रयत्नातच यश आले.

अहिल्या धरण हे गाळाने निम्मेहून अधिक भरले आहे. त्यात त्याला गळती असल्याने त्यात पाणी थांबत नव्हते. इतर तळी टाकी स्वच्छ करण्याच्या तुलनेत या तलावाची गळती काढली तर त्याचा येत्या वर्षभरात व विशेष करून उन्हाळ्यात लाभ होऊ शकतो, अशी मागणी मेटकऱ्यांच्या वतीने अशोक काका झोले यांनी केली होती.

आता ब्रह्मगिरीवर पाऊस सुरू झाला असून, कुठल्याही स्थितीत गळतीचा बोगदा योग्य पद्धतीने दगड-मातीचे थर देऊन दुरुस्त करण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Bramhagiri
Nashik News : श्री.स्वामी सेवामार्ग देणार बालकांना ‘स्वसंरक्षणाचे’ धडे : नितीनभाऊ मोरे

पावसाच्या तोंडावर होणारी विविध कीटकांची उत्पत्ती, मच्छरांचे प्रचंड प्रमाण, जोराचा वारा व पाऊस अशा विपरित वातावरणात रेन्बो व मेटकऱ्यांनी हे काम पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार व्यक्त केला. गंगाद्वाराची मेट, तसेच त्र्यंबकेश्वरमधील

काही स्थानिक मंडळींच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहसंरक्षक गणेशराव झोळे, वन परीक्षेत्र अधिकारी पवार, अरुण निंबेकर यांचे मेटकऱ्यांनी आभार मानले.

"ब्रह्मगिरीवर यंदा मोठे जलसंकट निर्माण झाले. भाविकांची प्रचंड वर्दळ असलेले हे ठिकाण पर्यावरण संवेदनशील असूनही येथे पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाल्याच्या पार्श्वभीवर अहिल्या तलावाच्या गळती दुरुस्तीच्या कामाने आनंदित होऊन काल गंगाद्वाराच्या मेटेवरच्या महिलावर्गाने भरपावसात ब्रह्मगिरीवर येऊन श्रमदान केले. आणखी काही ठिकाणच्या टाक्यातला गाळ काढला किंवा त्यांचे पाण्याचे स्त्रोत जिवंत केले तर गडावर पाण्याची आपूर्ती होण्यास मदत होईल, अशी भावना मेटकऱ्यांनी व्यक्त केली."

- प्रशांत परदेशी, सचिव, रेन्बो फाउंडेशन, नाशिक

रेन्बो फाउंडेशनचा पुढाकार

- ‘चला, जाणू या नदीला’ अभियानांतर्गत कुसमाडी येथील वनतळ्याच्या गळती दुरुस्ती व गाळ काढण्याचे काम

- त्र्यंबक रस्त्यावर नंदिनी नदीवर वासाळी येथील सिमेंट बंधारा व गाळ काढण्याचे काम

- वासाळी येथे जिवंत झरा लागल्याने भरउन्हाळ्यात नदीला लागले पाणी

- महिरावणी धरणात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेंतर्गत गाळ काढण्याचे काम सुरू

Bramhagiri
MSRTC Women Ticket Discount : सवलतींमुळे लालपऱ्या हाऊसफुल! 3 महिन्यात 15 कोटी महिलांनी केला प्रवास

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.