Nashik News :...अन् ब्रेक फेल झालेल्या बसला त्यांनी दगड लावून थांबविले!
पंचवटी (जि. नाशिक) : काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाच्या तसेच खासगी ट्रॅव्हल बसला अपघात घडण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मंगळवारी (ता.२०) रात्री पेठ रोडवर आरटीओकडून वाहन तपासणी सुरू असताना, गुजरातच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बसचे ब्रेक फेल झाल्याचे मोटार वाहन निरीक्षकांच्या लक्षात आले. त्यांनी वेगात असलेल्या बसच्या चाकात दगड टाकून थांबवत, बसमधील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून सुरक्षितस्थळी हलविल्याने पुढील अनर्थ टळला. (bravery of motor vehicle inspector shirodkar stopped brake failure bus by putting stone in tyre nashik news)
पेठ- गुजरात महामार्गावरील कपूरजिरा (ता. पेठ) येथे मंगळवारी (ता. २०) रात्री नेहमीप्रमाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे पथक अधिकारी वाहन तपासणी करीत होते. साडेबाराच्या सुमारास गुजरातच्या दिशेने जाणारी खासगी ट्रॅव्हल्स बसचे ब्रेक फेल झाले असल्याचे मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर यांच्या लक्षात आले.
त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता वाहन तपासणी पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेगात असलेल्या बसच्या चाकाखाली दगड लावून थांबविण्याचे प्रयत्न सुरू केले. बस थांबत नसल्याचे पाहून बसमधील सर्व प्रवाशांनी आरडाओरडा सुरू केला. काही वेळाने आरटीओ पथक करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले असता, लागलीच या बसमधील सुमारे तीस प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
यात लहान मुले, वृद्धांसह स्त्री- पुरुष यांचा समावेश असल्याने, या सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या चहापाण्याची व नाश्त्याची व्यवस्था शिरोडकर यांनी केली. तोपर्यंत नादुरुस्त असलेल्या ट्रॅव्हल्स बसची दुरुस्ती करण्यासाठी मेकॅनिक यांना घटनास्थळी बोलावून दुरुस्ती करण्यात आली. त्यांनतर ही बस गुजरातच्या दिशेने जाण्यासाठी तयार झाली.
देवमाणसाचे दर्शन
ही खासगी ट्रॅव्हल बस गुजरात राज्यातील असल्याने, खाकी वर्दीतील माणुसकी या वेळी सर्व प्रवाशांनी अनुभवली. वेळीच खाकीतला देवमाणूस मदतीला धावून आल्याच्या भावना अनेकांनी व्यक्त केल्या. कर्तव्य बजावत असताना अधिकारी व कर्मचारी वर्ग दक्ष असल्यास, मोठी दुर्घटना टाळता येऊ शकते. हेच या घटनेमुळे सर्वांच्या समोर आले असून, मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर व त्यांच्या पथकावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.