Nashik News : वाढत्या मजुरीला लागणार यांत्रिक पेरणीमुळे ब्रेक!

sowing
sowingesakal
Updated on

लखमापूर (जि. नाशिक) : कांदा हे नगदी पीक असून दराबाबत बेभरवशाचे पीक अशी याची ओळख असतानाही कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सुरु केली आहे. मात्र, दिवसागणिक मजुरांची टंचाई व मजुरी मोठी डोकेदुखी ठरत असतानाच यांत्रिक पद्धतीने बी-पेरणी चांगला पर्याय समोर येऊ पाहत आहे.

सध्या रब्बी हंगामातील कांदा लागवडीची लगबग सुरु झाली आहे. यापूर्वी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती. पण आता बदलत्या काळात शेतकऱ्यांचा पेरणीकडे कल आहे. (Break due to increasing wages due to mechanical sowing Nashik News)

कांदा लागवडी मजुरांकडून करावयाची झाल्यास एकरी किमान अकरा ते बारा हजारांच्या आसपास लागवड खर्च येतो. मजुरांची ने आण व त्यांच्या पाहुणचारासाठी येणारा खर्च तसेच, अगोदर रोपाची टाकणी व लागवडीसाठी लागणारे जास्तीचे बियाणे, रोग व किडीचे नियंत्रण, वावर बांधणी आदींचा समावेश यात आहे.

मजुरांकरवी लागवड करावयाची झाल्यास एकरी किमान चार ते पाच दिवसाचा कालावधी लागतो. अर्थात मजूर कमी जास्त झाली तर यात बदल होत असला तरी यंत्राच्या साहाय्याने पेरणी केल्यास अवघ्या काही तासांच्या आत दोन किलो बियाण्यात एकरभर लागवड केली जाते. त्यामुळे अवघा तीन हजारच्या घरात एकरी खर्च जातो.

यांत्रिक पद्धतीने पेरणी केलेल्या कांद्याचा खर्च बियाणे दोन किलो चार ते पाच हजार, पेरणीसाठी तीन हजार, रासायनिक खत (एक ते दीड गोणी) चोवीसशे ते पंचवीसशे असा एकूण दहा ते बारा हजाराच्या आसपास खर्च येतो.

हेही वाचा : जोखमीचे भान राखूनच करा SIP मध्ये गुंतवणूक

sowing
Nandurbar Police News : कुडकुडणाऱ्या निराधारांना खाकीची ऊब

पारंपारिक लागवडीचा खर्च ३० हजार

मजुरांकरवी लागवडीसाठी येणारा खर्च, बियाणे साधारण चार ते पाच किलो, रोपाचे व्यवस्थापन किमान दोन हजार, रोप तयार करणे व वाहतूक दोन ते तीन हजार, वावर बांधणी दोन हजार, लागवड मजुरी आकार तेरा हजार, मजूर वाहतूक तीन ते चार हजार रासायनिक खत (किमान तीन गोणी) पाच हजार असा किमान तीस ते पस्तीस हजारांचा खर्च येतो. या मुळे दिवसागणिक आता यांत्रिक पद्धतीने लागवड केल्याने वाढत्या खर्चाबरोबरच वेळेचीही बचत होते.

"गत वर्षीपेक्षा यंदा मशिनने लागवड करणाऱ्यांची संख्या अधिक असून भविष्यात यात अजून वाढ होईल." - दीपक कुटे, सायखेडा.

"मागील वर्षी यांत्रिक पद्धतीने कांदा लागवड केल्याने अवघ्या दहा ते बारा हजाराच्या आसपास खर्च आला, त्यात खर्चात मोठी बचत झाली. उत्पादन व गुणवत्ताही चांगली राहिल्याने या वर्षीही पुन्हा यांत्रिक लागवडच केली आहे." -आनंदराव मोगल, कांदा उत्पादक शेतकरी.

"कांद्याचे रोप टाकून त्याची लागवड करेपर्यंत होणारा त्रास दिवसागणिक वाढत आहे, या मुळे पैसा व वेळेचा अपव्यय होतो व किमान तीस ते पस्तीस हजारांचा खर्च येतो. यात बदल करावा लागेल." - अंकुश मोगल, कांदा उत्पादक शेतकरी.

sowing
Yeola Water Scarcity : येवला शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.