Breaking News : नाशिकमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांचे अन्नत्याग आंदोलन!

Students
Studentsesakal
Updated on

पंचवटी (जि. नाशिक) : निकृष्ठ दर्जाचे जेवण मिळत असल्याचा संताप व्यक्त करीत पेठरोडवरील एकलव्य वसतिगृहाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवार (ता. ६) रोजी अन्नत्याग आंदोलनास सुरवात केली. या अगोदरही येथील विद्यार्थ्यांनी निकृष्ट दर्जाच्या जेवणाबाबत तक्रारी केल्या आहेत, आंदोलने केली आहेत. मात्र, त्या परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने शेकडो विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला. (Breaking News Tribal students from eklavya modern residential school food sacrifice agitation in Nashik news)

हेही वाचा : ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

Students
SAKAL Impact News : समस्या दूर होताच साईंग्राम उद्यान चकाचक!
जेवणात अळी
जेवणात अळी esakal

पेठरोडवरील आदिवासी विभागाच्या वसतिगृहात एकलव्य शाळेत मध्ये ३९४ विदयार्थी व विद्यार्थिनीना शिक्षणाची व राहण्याची सुविधा आहे. यात आजघडीला इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यतचे विदयार्थी व विद्यर्थिनीं शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी आदिवासी विभागाने काही वर्षांपूर्वी सेंट्रल किचन संस्थेकडे काम दिले आहे.

मात्र त्यांच्याकडून पुरवठा होत असलेल अन्न निकृष्ठ दर्जाचे असल्याचा आरोप करीत विद्यार्थ्यांनी आज दुपारचे १२ वाजेच्या जेवणावर बहिष्कार टाकत अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यापूर्वी संबधीत ठेकेदार कंपनीला वारंवार सांगून तसेच लेखी तक्रार करून देखील जेवणाचा दर्जा सुधारत नसल्याने विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त करीत यावेळी शाळेतील प्राचार्य सुरेश देवरे, गृहपाल महेश दामले यांच्याकडे तक्रार केली.

मात्र, दुपारपर्यत यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. विद्यार्थ्यांनी मशीनने तयार केलेल्या पोळ्या कच्या असतात तसेच भाजीत केवळ पाणी असल्याने त्याला चव लागत नाही.

त्याच प्रमाणे ठेकेदार ठरवून देत नाही, निकृष्ठ अन्न खाल्याने अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याचा आरोप केला असून प्रामुख्याने हाताने तयार केलेल्या पोळ्या द्याव्या , भाजीचा दर्जा चांगला असावा दर्जेदार अनु मसाला टाकून द्यावी आणि ठरवून दिलेल्या मेनू विद्यार्थ्यांना द्यावे अशी मागणी केली आहे.

Students
Nashik News : कामाच्या अनुभवावरून सफाई कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार! राज्य शासनाचा निर्णय

"विद्यार्थी धडकणार मंत्रालयावर"

अन्न त्याग आंदोलनाची दखल घेत.अप्पर आयुक्त संदीप गोलाईत, उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी भेट देत पाहणी केली.आंदोलन कर्ते विद्यार्थी व विद्यार्थिनी च्या तक्रारी जाणून घेतल्या. चार पाच दिवसात होणाऱ्या अन्न पुरवठ्यात सुधारणा होईल असे आश्वासन दिले. त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, सुधारणा न झाल्यास आम्ही सर्व विद्यार्थी मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जाऊ असा इशारा ही दिला.

"भाजीत पाणी असल्याने चव लागत नाही. मशीनने केलेल्या पोळ्या कच्या राहतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होतात.तरी आम्हाला हाताने तयार केलेल्या चपात्या मिळाव्यात ही आमची प्रमुख मागणी आहे." - सोनाली डगळे, विद्यार्थिनी

"अक्षरशः दाळीत अळल्या निघाल्या, हा एकप्रकारे आमच्या जीवाशी खेळ आहे.भाजी वेगवेगळी नसून एकत्र होऊन येते. दर्जे युक्त नाष्टा जेवण मिळावं ही आमची माफक अपेक्षा आहे. परंतु ती देखील पूर्ण होत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे." - मुकेश पावरा, विद्यार्थीनी

"विद्यार्थ्यांनी चांगले जेवण मिळत नसल्याने अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून घडलेल्या प्रकाराची माहिती कळविली आहे. विद्यार्थ्यांचा प्रश्न मार्गी लागेल.त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहे" - सुरेश देवरे, मुख्याध्यापक

"मुंडेगाव येथील सेंट्रल किचन येथून नाशिक जिल्ह्यातील जवळपास तीस ते चाळीस आश्रम शाळांना अन्न पुरविले जाते.या अन्न पुरवठा बंद करून, संबधित ठिकाणी किचन करावे. आदिवासी समाजाच्या मुलामुलीं वर होणारा अन्याय थांबावावा.या प्रकरणी आदिवासी विकास मंत्री यांची भेट घेत, सेंट्रल किचन बंद करावी अशी मागणी करणार आहे."

- लकी जाधव, प्रदेशाध्यक्ष,अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

Students
Crime News : विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या; मृतदेहाचे तुकडे करून कालव्यात दिले फेकून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.