Nashik ZP News : आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना स्तनपानाचे धडे : आशिमा मित्तल

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal speaking at the press conference held on Saturday.
Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal speaking at the press conference held on Saturday.esakal
Updated on

Nashik ZP News : जिल्ह्याला कुपोषणमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेने हे पाऊल उचलले असून, जिल्हा परिषद आणि आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाभरात प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविला जात आहे. या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या ३०० प्रशिक्षणार्थींचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.

हे प्रशिक्षणार्थी आता जिल्ह्यातील आरोग्य व महिला-बालकल्याण अंतर्गत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत.

येत्या अडीच महिन्यात जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना हे स्तनपानाचे धडे दिले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली. (Breastfeeding lessons for employees through health center by zp nashik news)

जिल्हा परिषद नाशिक व आयआयटी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्ह्यामध्ये प्रभावी स्तनपान व पोषण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या सर्वांमधून प्रशिक्षणाची निवड करण्यात आली होती व त्यांना मार्च महिन्यामध्ये जिल्हास्तरावर या कार्यक्रमाबाबत सखोल प्रशिक्षण देण्यात आले.

त्यानंतर या ३०० प्रतिक्षणार्थींनी दिलेल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन घेतलेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक केले. यामध्ये प्रत्येक प्रशिक्षणार्थीने प्रत्येकी दहा दत्तक केले होते. त्यांचा सखोल अभ्यास करत अंतिम परीक्षेमधून ५९ मेंटर व ३० फॅसिलीटर म्हणून निवड करण्यात आली. शनिवारी (ता. २३) हे प्रशिक्षण पूर्ण झाले. जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात प्रशिक्षणार्थींनी आज अनुभव पत्रकारांसमोर कथन केले.

या कार्यक्रमांतर्गत स्तनपानासाठी ‘क्रॉस कँडल होल्ड’ या पद्धतीने स्तनपान करण्यावर भर देण्यात आला असून, त्याचबरोबर प्रभावी लॅचिंग, स्तनपान करताना सुरवातीचे संकेत कसे ओळखावे, गरोदर मातेने गरोदरपणात घ्यावयाचा पोषण आहार व बाळाच्या सहा महिने वयानंतर सुरू करण्यात येणाऱ्या पूरक आहारावर विशेष भरत देण्यात आला आहे.

यासोबतच जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये ‘प्रभावी स्तनपान फेरी’ व ‘डिसचार्ज क्रायटेरिया’ या दोन उपक्रमसुद्धा प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal speaking at the press conference held on Saturday.
Chandrashekhar Bawankule News : नाशिकसाठी बावनकुळेंचीच कसोटी! युतीत मोठी तडजोड करावी लागण्याची शक्यता

यामुळे बाळाला जन्माच्या नंतर एख तासाच्या आतच स्तनपान सुरू करणे व प्रसूती झालेल्या मातांना प्रभावी स्तनपानाबाबत योग्य मार्गदर्शन करण्यात येते.

या उपक्रमामुळे बाळाचे वजनवाढीसाठी मदत होत असल्याचे मित्तल यांनी सांगितले. प्रशिक्षण घेतलेल्या मेंटर व फॅसिलीटेटर यापुढील अडीच महिन्यात जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व आरोग्य विभाग व माता व बालसंगोपन विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देणार आहेत. या माध्यमातून जिल्ह्यातील कुपोषण घटण्यास मदत होणार असल्याचा दावा मित्तल यांनी केला.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे, मुंबई आयआयटीच्या डॉ. रुपल दलाल, डॉ. देवजी पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागूल, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. हर्शल नेहेते, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे आदी उपस्थित होते.

सादरीकरणातून मांडले कुपोषण

डॉ. दलाल आणि डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत प्रशिक्षण काळात निवड झालेल्या बाळाची आकडेवारी, माहिती मांडत कमी वजानाच्या बाळांचे वजन वाढल्याचे सविस्तर सादरीकरण करत कुपोषणात घट झाल्याचे दाखविले. त्यानंतर प्रशिक्षणार्थींनी निवड केलेल्या बाळ व त्यांच्या माता यांनी प्रशिक्षणात नेमके काय मिळाले, हे सांगितले. काही प्रशिक्षणार्थींनी अनुभव विशद केले.

Chief Executive Officer of Zilla Parishad Ashima Mittal speaking at the press conference held on Saturday.
Children Mobile Addiction : मोबाईलच्या वापराने मुले ‘स्वमग्नते’चे शिकार; पालकांचे दुर्लक्ष, बौद्धिक विकास खुंटतोय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.