Nashik Bribe Case : सतीश खरे, सुनीता धनगर यांच्या कारागृहातील मुक्कामात वाढ

Sunita Dhangar & Satish Khare
Sunita Dhangar & Satish Khareesakal
Updated on

Nashik Bribe Case : बडतर्फ मुख्याध्यापकाकडून ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आलेल्या नाशिक महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर आणि ३० लाखांची लाच स्वीकारणारे जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्कामात वाढ झाली आहे.

श्रीमती धनगर व खरे यांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. ९) होणारी सुनावणी सोमवारपर्यंत (ता. १२) पुढे ढकलण्यात आली आहे. (bribe case Increase in jail stay of Satish Khare Sunita Dhangar nashik crime news)

नाशिक रोड परिसरातील एका शिक्षण संस्थेने बडतर्फ केलेल्या मुख्याध्यापकाकडून महापालिकेच्या शिक्षणाधिकारी सुनीता धनगर यांनी ५० हजार रुपयांची तर लिपिक नितीन जोशी याने पत्र काढण्यासाठी ५ हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती २ जून रोजी महापालिकेतील दालनात स्वीकारली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोघांना रंगेहाथ लाच स्वीकारताना अटक केली होती. दोघेही गेल्या बुधवारपर्यंत (ता.७) पोलिस कोठडीत होत्या. सध्या त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याने त्या नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहेत. श्रीमती धनगर यांच्या घरझडतीतून कोट्यवधीची मालमत्ता पथकाच्या हाती लागली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Sunita Dhangar & Satish Khare
NMC Bribe Case : लाच प्रकरणात अटक नाही म्हणून नोकरीत रूजू; शिक्षण विभागातील खाबुगिरी पळवाटांना ब्रेक

गेल्या १५ मे रोजी ३० लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी नाशिक जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली होती. खरेही पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत आहे.

या दोघांच्या जामीन अर्जावर शुक्रवारी (ता. ९) सुनावणी होणार होती. परंतु सदरील सुनावणी न्यायालयाने सोमवारपर्यंत (ता.१२) पुढे ढकलली आहे. त्यामुळे लाचखोर खरे आणि श्रीमती धनगर यांचा नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील मुक्काम वाढला आहे. सोमवारी दोघांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

Sunita Dhangar & Satish Khare
Bribe Crime : महसूल विभागातील उच्चपदस्थ अधिकारी लाच घेताना सीबीआयच्या जाळ्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.